Vasu Baras : गाय आणि वासरांची पूजा करून करा दिवाळीची सुरुवात, जाणून घ्या वसु बारसचे महत्त्व आणि पूजेची पद्धत

Vasu Baras : सर्वजण दिवाळीची (Diwali 2022) आतुरतेने वाट पाहत आहेत. या सणाची सुरुवात ‘वसू बारस’ ने होते. ग्रामीण भागात हा दिवस (Vasubaras) शेतकरी आपल्या गाय आणि वासरांची पूजा करून साजरा करतात.

कृष्ण स्वरूपात प्रभूंचे गाय ही प्रतिनिधित्व करते, अशी श्रद्धा असल्यामुळे या दिवसाला (Vasu Baras 2022) विशेष महत्त्व आहे. देशाच्या इतर भागात काही जण हा दिवस ‘गुरु द्वादशी’ (Guru Dwadashi) किंवा ‘गोवत्स द्वादशी’ (Govts Dwadashi) म्हणून साजरा करतात.

वसु बारस का साजरी करतात?

अश्विन महिन्यात येणाऱ्या वद्य द्वादशीस गोवस्त द्वादशी असे म्हणतात. या दिवशी वसुबारस साजरा करतात. वसुबारसेला गोठ्यातील गाईची पूजा केली जाते. वसुबारसेविषयी अशीही आख्यायिका सांगितली जाते की समुद्रमंधन केल्यानंतर पाच कामधेनू निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक एक कामधेनू होती. या धेनूस उद्देशून वसूबारसेस हे व्रत करतात.

वसु बारस पूजा

द्वादशीच्या दिवशी (Vasu Baras in 2022) सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात. ही पूजा मुख्यतः संध्याकाळी करतात. पूजेच्या अगोदर त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घातला जातो. त्यांच्या कपाळावर हळदी-कुंकू लावले जाते.

काही ठिकाणी गाय, वासरू यांच्या मूर्ती ठेवल्या जातात. या दिवशी गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग त्यांना भोग म्हणून दिले जातात. यानंतर आरती केली जाते, भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उपवास करतात.

वसु बारसचे महत्त्व

वसु बारस (गोवत्स द्वादशी) चे माहात्म्य भविष्य पुराणात सांगितले आहे. याला बाच बारसचा सण असेही म्हणतात. हा सण नंदिनी व्रत म्हणूनही साजरा केला जातो, कारण नंदिनी आणि नंदी (बैल) हे दोन्ही शैव धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात.

हा सण मुळात गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी गाय आणि वासरू यांची संयुक्त पूजा केली जाते. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात.

असे मानले जाते की गोवत्स द्वादशीची पहिली पूजा राजा उत्तानपाद (स्वयंभू मनूचा मुलगा) आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी उपवास करून केली होती. त्यांच्या प्रार्थना आणि उपवासामुळे त्यांना ध्रुव नावाचा पुत्र प्राप्त झाला.

या दिवशी उपासक गहू आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करत नाहीत. काही उत्तरेकडील राज्यांमध्ये, या दिवसाला वाघ म्हणून संबोधले जाते, म्हणजे आर्थिक कर्ज फेडणे.

या दिवशी व्यापारी आपले खाते साफ करतात. या दिवशी नवीन खात्यात व्यवहार करू नका. या दिवशी व्रत आणि उपासनेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe