Ganga Vilas Cruise : पाण्याच्या महालात राहायचंय? तर मग जाणून घ्या तिकीटापासून बुकिंगपर्यंत सर्व…

Published on -

Ganga Vilas Cruise : केंद्र सरकारने नद्यांमधून सर्वाधिक लांबीची सफर करणारी ‘गंगा विलास’ ही क्रूझ सुरू केली आहे. ही क्रूझ 10 जानेवारीला वाराणसी येथून निघून बांगलादेशच्या हद्दीतून निघणार आहे. 

तसेच विविध पर्यटनस्थळांना भेट देत आसामच्या दिब्रूगढपर्यंत जाणार आहे. या दरम्यान क्रूझ 50 दिवसांत 3200 किमीचा पल्ला गाठणार आहे. हा उपक्रम चालू करण्याचे कारण म्हणजे जलमार्गाद्वारे पर्यटनाला चालना देणे होय.

केला जाणार 3200 किलोमीटरचा प्रवास

पाहुण्यांना काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरती दाखवली जाणार आहे. वाराणसीच्या रस्त्यांवर फेरफटका मारला जाईल. त्यानंतर 13 जानेवारीला ही क्रूझ 3200 किलोमीटर जलमार्गासाठी रवाना होणार आहे. यामध्ये बसलेल्या पाहुण्यांना दिब्रुगडच्या प्रवासासाठी नेण्यात येणार आहे.

वाराणसी ते बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगड असा प्रवास करावा लागतो. हा प्रवास 52 दिवसांचा असून दरम्यान क्रूझ भारत आणि बांगलादेशच्या 27 नदी प्रणालींमधून जाईल. वैशिक 50 हेरिटेज स्थळांजवळ थांबली जाणार आहे.

इतकी आहे तिकीटाची किंमत 

या क्रूझवर प्रवास करण्यासाठी अनेक पॅकेजेस असून खर्च ठिकाणावर अवलंबून असणार आहे. सर्वात महाग तिकीट 4 लाख 37 हजार रुपये तर सर्वात कमी तिकीट 90 हजार रुपये इतके आहे. कोलकाता ते वाराणसी हा प्रवास 12 दिवसांचा आहे.

या प्रवासाचे तिकीट 4 लाख 37 हजार रुपये आहे. कोलकाता ते ढाका प्रवास 4 लाख 37 हजार रुपये आहे. कोलकाता ते मुर्शिदाबाद या प्रवासासाठी 2 लाख 93 हजार रुपये खर्च करावे लागतील. तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला http://antaracruises.com वर लॉग इन करावे लागेल.

खासियत

या क्रूझची लांबी 62.5 मीटर आणि रुंदी 12.8 मीटर आहे. या क्रूझवर 18 उत्कृष्ट सूट आहेत. यामध्ये प्रवासी प्रवास करतील. अत्याधुनिक बाथरूम, शॉवर, एलईडी टीव्ही, बेड, तिजोरी, फ्रेंच बाल्कनी आदी सुविधा आहेत. 40 आसनी रेस्टॉरंट आहे. एक स्पा आणि सन डेक देखील आहे. एवढेच नाही तर प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News