Graduation झाल्यानंतर कोणते मास्टर्स कोर्स देतात लाखोंचा पगार?, पाहा टॉप मास्टर कोर्सची यादी!

Published on -

पदवी मिळाल्यावर पुढे काय? हेच प्रश्न अनेक तरुणांच्या मनात असतात,त्यातच मोठा आणि चांगला पगार ही महत्त्वाची अपेक्षा असते. काही जण स्वप्नं पाहतात की लवकरात लवकर आर्थिक स्थैर्य मिळावं, काहींना विदेशात संधी मिळावी असं वाटतं, आणि काही तरुण केवळ आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडतात. यासाठी काही मास्टर्स कोर्सेस हे इतके फायदेशीर ठरतात की ते आयुष्य बदलून टाकतात.

एमबीए

व्यवसाय जगतातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक पगार देणारा कोर्स म्हणजे एमबीए. या कोर्समध्ये केवळ मार्केटिंग, फायनान्स किंवा एचआर शिकवलं जात नाही, तर तुम्हाला नेतृत्व, निर्णयक्षमता आणि कॉर्पोरेट खेळी शिकायला मिळते. IIM किंवा टॉप बिझनेस स्कूलमधून एमबीए केल्यास, तुम्हाला 25 ते 50 लाख रुपयांचे पॅकेज मिळण्याची शक्यता असते. यामध्ये केवळ अभ्यास नाही, तर केस स्टडी, इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्सचा अनुभव तुमच्या करिअरला गती देतो.

कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स

तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळलो तर, कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स करणं म्हणजे डिजिटल युगाच्या पुढच्या दरवाजाकडे चालत जाणं. एआय, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी ही क्षेत्रं जगभर मागणीला आहेत. गुगल, अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या तर अशा स्पेशालिस्ट्सना कोटींच्या पगारात भरती करतात. त्यामुळे टेक प्रेमींनी या क्षेत्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

MHA

आरोग्यसेवा क्षेत्रात MHA म्हणजेच मास्टर ऑफ हेल्थकेअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही डिग्री डॉक्टर नसतानाही वैद्यकीय व्यवस्थापनात करिअर करायची संधी देते. रुग्णालये, आरोग्यसंस्था आणि हेल्थ टेक स्टार्टअप्समध्ये हे पदवीधर मोठी भूमिका बजावतात. भारतात सुरुवात 6 ते 12 लाखांच्या पगाराने होते, पण परदेशात हे आकडे 60 लाखांपर्यंत जातात.

इंजिनिअरिंग मॅनेजमेंट

अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट हा एक सुवर्णमधला मार्ग आहे. तो टेक आणि मॅनेजमेंट या दोघांना जोडणारा कोर्स आहे. जिथे तुमच्या तांत्रिक ज्ञानाला व्यवसायाचे पंख मिळतात. अमेरिकेत याचे पॅकेज 1 कोटीपर्यंत जाते.

डेटा सायन्स

डेटा सायन्सला सध्या सर्वाधिक मागणी आहे. कारण प्रत्येक कंपनीला माहिती हवीच असते, पण ती कशी वाचायची, विश्लेषण कसं करायचं हे डेटा सायंटिस्ट शिकवतो. या क्षेत्रात मास्टर्स केलेल्या उमेदवारांना 20 लाखांपर्यंतचा सुरुवातीचा पगार मिळतो. आणि ही मागणी सतत वाढतच आहे.

MSN

नर्सिंग क्षेत्रात मास्टर्स म्हणजेच MSN ही एक जबाबदारीने भरलेली पण अतिशय कमाईची संधी आहे. नर्स प्रॅक्टिशनर किंवा अ‍ॅनेस्थेटिस्ट भारतात 10 ते 15 लाख कमवू शकतात, तर अमेरिकेत याचे आकडे 2.8 कोटीपर्यंत पोहोचतात.

अर्थशास्त्रामध्ये मास्टर्स

 

अर्थशास्त्रामध्ये मास्टर्स हीही एक संधी आहे जिथे तुमचं विश्लेषण कौशल्य आणि डेटा समज तुम्हाला आर्थिक धोरणे तयार करण्यापर्यंत घेऊन जातं. या क्षेत्रातील तज्ञांची भारतात मागणी आहेच, पण जागतिक बँक, IMF, आणि परदेशी वित्त संस्था यांच्यासाठी देखील तुम्ही योग्य उमेदवार बनता.

प्रसार माध्यमं, जनसंपर्क, निधी संकलन हे क्षेत्र थोडं वेगळं पण तितकंच आकर्षक. कारण इथे तुम्ही ब्रँडचा चेहरा बनता, जनमत घडवता. पगार 6 ते 12 लाखांनी सुरू होतो, पण अनुभवानुसार कोटींच्या पातळीवर पोहोचतो.

या सगळ्यातून योग्य कोर्स कसा निवडायचा? तर यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमची आवड, तुमचं कौशल्य आणि त्या क्षेत्राची बाजारातील मागणी. शिवाय ROI म्हणजे गुंतवणुकीवर परतावा याचा विचार करा. आणि हे करताना कोर्सेरा, युडेमी किंवा BLS.gov सारख्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास करून निर्णय घ्या.

मोठ्या पगारासाठी केवळ डिग्री नव्हे, तर उच्च शिक्षण संस्था, इंटर्नशिपचा अनुभव, आणि डिजिटल कौशल्यं हे सगळं मिळवणं महत्त्वाचं आहे. तुमचा नेटवर्क बळकट ठेवा, लिंक्डइनवर प्रेझेन्स वाढवा आणि सतत शिकत राहा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!