‘या’ शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल…१ लाखाचे झाले २५ लाख

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- गेल्या वर्षभरात मुंबई शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. या कालावधीत एका मल्टिबॅगर स्टॉकमध्ये २,३३२.२ टक्के वाढ पाहायला मिळाली.

ब्राईटकॉम कॉर्पच्या शेअरनं गुंतवणूकदारांना तब्बल २,३३२.२ टक्के इतका परतावा दिला. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ब्राईटकॉम कॉर्प कंपनीच्या एका शेअरची किंमत ६.१७ रुपये होती. सोमवारी याच शेअरची किंमत १५०.१० रुपये झाली.

याचा अर्थ वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये कोणी १ लाख गुंतवले असतील, तर आता त्याची किंमत २४.३२ लाख रुपये झाली आहे.

ब्राईटकॉम कॉर्प मिडकॅप प्रकारात मोडतो. काल बीएसईवर उलाढाल थांबली तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत १५७.७० रुपये होती.

सकाळी व्यवहारांना सुरुवात होताच शेअरची किंमत घसरून ती १४९.८५ रुपयांवर पोहोचली. त्यानंतर त्यात थोडी सुधारणा झाली.

बीएसईवप कंपनीचं बाजारमूल्य १५,६०८ कोटी रुपये आहे. ५ मे २०२१ ते २४ डिसेंबर २०२१ या ७ महिन्यांच्या कालावधीत शेअरची किंमत ३,४१८ टक्क्यांनी वाढली. ब्राईटकॉम समूह जगभरात ऍड टेक, न्यू मीडियावर काम करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe