आज पासून मिळणार बुस्टर डोस, यासाठी नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही…वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- देशभरात शुक्रवारी रात्री उशिरा, १,४१,५२५ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच वाढत्या कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, देशभरात आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

या बूस्टर डोससाठी कोविन वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असेही केंद्राने म्हटले आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, यामध्ये पात्र असलेले आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहे,

तसेच ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमायक्रॉन प्रकाराच्या प्रसारादरम्यान लसीचा बूस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घोषणा केली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर, ओमायक्रॉन रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

ज्या लसीचे दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा, असे केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे.

यासंदर्भातील ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधा शुक्रवारपासून सुरू झाली असून त्याचा शेड्युल आजपासून प्रकाशित केले जाणार आहे. ऑनसाइट अपॉइंटमेंटसह लसीकरण १० जानेवारीपासून सुरू होईल, असे एएनआय या वृत्तसंस्थेने मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देत सांगितले आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासांत करोना विषाणूचे एक लाख ४१ हजार ५२५ नवीन रुग्ण आढळले आहेत. याआधी शुक्रवारी १ लाख १७ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या २० टक्के वाढत चालली असून येत्या ४ दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांची वाढ ४० टक्क्यांहून अधिक आहे. तसेच देशात २८५  लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात करोनाच्या ओमायक्रॉन बाधितांची ३०७१ प्रकरणे समोर आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe