Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार माणसाचे भविष्य सांगितले जाते. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा चांगला आणि वाईट परिणाम इतर 12 राशींच्या लोकांवर दिसून येतो. तसेच ग्रहांच्या हालचालीनुसार काही राजयोग देखील तयार होतात. जे काही राशींसाठी खूप शुभ सिद्ध होतात.
प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो, ज्यामुळे अशुभ आणि शुभ योग तयार होतात, अशातच एका राशीत दोन ग्रहांच्या आगमनाने राजयोग देखील तयार होतो. या क्रमाने अनेक वर्षांनंतर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस 3 दुर्मिळ राजयोग तयार होणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार 16 नोव्हेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश केल्याने रूचक योग तयार झाला आहे, तर शनि मूळ त्रिकोणी कुंभ राशीत स्थित आहे, त्यामुळे सुमारे 30 वर्षांनी शश राजयोग तयार झाला आहे. आता बुध धनु राशीत प्रवेश केल्यामुळे महाधन योग तयार होणार आहे, अशा परिस्थितीत वर्षाच्या अखेरीस या दुर्मिळ योगांची निर्मिती 3 राशींसाठी खूप फलदायी ठरणार आहे.
कुंभ
30 वर्षांनंतर शनीचे कुंभ राशीत होणारे आगमन कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी मानले जात आहे. 30 वर्षांनंतर तयार झालेले हे राजयोग देखील वरदानापेक्षा कमी नाही. या काळात कुंभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तसेच शनिदेव आणि बुधाचा आशीर्वाद मिळेल, या विशेष योगामुळे व्यवसायात देखील वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. या काळात वाहन, मालमत्ता, घर खरेदीचा योग आहे.
मेष
दीर्घ काळानंतर या तीन राजयोगांची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरू शकते. या काळात व्यापारी आणि नोकरदारांसाठी चांगल्या संधी येऊ शकतात. तसेच व्यवसायात प्रगतीसह आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. या काळात नोकरीत पगारवाढीचा देखील लाभ मिळू शकतो. अडकलेला पैसा परत येऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. एकूणच हे योग तुमच्यासाठी खूप खास असणार आहेत.
वृश्चिक
दीर्घ कालावधीनंतर, नोव्हेंबरच्या शेवटी 3 दुर्मिळ राजयोग तयार झाल्यामुळे काही राशींना चांगले लाभ मिळणार आहेत. वृश्चिक राशीचाही यात समावेश आहे. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांनाच धैर्य आणि पराक्रम वाढेल तसेच शत्रूंचा पराभव करण्यात यश येईल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ चांगला राहील. काहीतरी मोठी जबाबदारी मिळण्याची आशा आहे. तुमच्या कामात यश मिळेल. तसेच या काळात आर्थिक स्थिती देखील सुधारेल.