Ayurvedic Remedies : थंड हवामान, लिपस्टिकचा अतिवापर, आणि त्वचेतील ओलावा कमी होणं यामुळे ओठ काळे आणि रुक्ष होतात. पण एक साधं घरगुती उपाय आपल्या ओठांचा नैसर्गिक सौंदर्य पुन्हा उजळवू शकतो – आणि तो म्हणजे साजूक तूप आणि हळदीचं मिश्रण.
ओठांसाठी खास घरगुती लिपबाम
जर तुमचे ओठ काळसर झाले असतील, तर तुम्ही १ चमचा साजूक तुपात चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण एका स्वच्छ छोट्या वाटीत तयार करा. संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी हे मिश्रण ओठांवर लावा.

शक्य असल्यास ते रात्रभर ओठांवर ठेवा. हळदेमुळे त्वचेतील दाग व डाग दूर होतात आणि साजूक तुपामुळे ओठांतील ओलावा टिकतो. हे लिपबामप्रमाणे काम करतं आणि ओठांना नैसर्गिक पोषण पुरवतं.
पापड्या हटवण्याचा सोपा उपाय
जर मिश्रण लावताना किंवा नंतर अस्वस्थता जाणवत असेल, तर थोडा कापूस घ्या आणि हलक्या हाताने ओठांवरील सुकलेल्या पापड्या साफ करा. यामुळे मृत त्वचा सहज निघून जाईल आणि ओठ अधिक मऊ वाटतील.
नियमित वापराचे फायदे
साजूक तुपाचा नियमित वापर केल्यास ओठ गुलाबी, मऊ आणि नितळ होतात. हे उपाय ओठांच्या त्वचेला उजळवण्यास आणि नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. लिपस्टिक, लिपकलर किंवा अन्य सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे काळे झालेले ओठही यामुळे पूर्ववत होऊ शकतात.
ही रेमेडी अगदी घरच्या घरी, सहज उपलब्ध साहित्याने करता येते आणि कोणतेही रासायनिक उत्पादन न वापरता ओठांचे सौंदर्य खुलवते. म्हणूनच, एकदा तरी हा उपाय जरूर करून पहा – तुमचे ओठ तुमच्यावर प्रेम करतील!