Diabetes : मधुमेह हा सध्या एक गंभीर आजार बनत चालला आहे. मधुमेहाच्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अतिरिक्त साखरेमुळे हा आजार होत असल्याचे म्हंटले जात असले तरी फक्त साखरच नव्हे तर मीठ खाल्याने सुद्धा हा आजार होऊ शकतो असे एका संशोधनातून समोर आले आहे. जाणून घ्या याबद्दल.
आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये पदार्थाची चव वाढविण्यासाठी मीठ वापरतो. पण मिठाच्या जास्त सेवनामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका बळावतो. टुलेन युनिव्हर्सिटीच्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की अन्नामध्ये जास्त मिठाचा वारंवार वापर टाईप 2 मधुमेहाशी निगडीत आहे. याम
दरम्यान, या अभ्यासात ब्रिटनमधील 400,000 हून अधिक प्रौढांचे त्यांच्या मिठाच्या सेवनाच्या सवयींचे सर्वेक्षण करण्यात आले. अभ्यासात समाविष्ट असलेल्या लोकांना पाच श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते, ज्यामध्ये हे लोक “कधीही नाही,” “क्वचितच,” “कधीकधी,” “सामान्यतः” किंवा “नेहमी” अन्नामध्ये मिठाचा वापर करतात. असे वर्गीकरण केले होते. दरम्यान, हा अभ्यास मेयो क्लिनिक प्रोसीडिंग जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
दरम्यान, जास्त मीठ खाल्ल्याने काही लोकांमध्ये वॉटर रिटेंशन आणि ब्लोटिंगची समस्या उद्भवते. तसेच तुम्ही जास्त मीठ खाल्ल्यास, सोडियमची पातळी वाढल्याने किडनीच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो.
तसेच, दीर्घकाळापर्यंत जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील टिशूज आणि सेल्स द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे हाडे खराब होतात आणि ऑस्टिओपोरोसिस होतो.
दरम्यान, आपल्या रोजच्या आहारामध्ये मिठाचे सेवन हे कमी प्रमाणात ठेवल्यास या आजाराचा धोका उद्भवत नाही. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार असणे आवश्यक आहे.