Woman Health : आपल्या रोजच्या कामाच्या धावपळीमुळे अनेक स्त्रिया या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. योग्य आहार न घेतल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. ज्यामुळे अगदी कमी वयात त्यांना अनेक आजार उद्भवतात.
एका ठराविक वयानंतर स्त्रियांच्या शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत. ज्यामुळे हाडे कमकुवत होणे अनियमित मासिक पाळी तर हार्मोनचे होणारे असंतुलन असे आजार बळावतात. प्रामुख्याने स्त्रियांमध्ये लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दिसून येते. त्याची प्रामुख्याने अनेक कारणे असू शकतात. जाणून घ्या याबद्दल.
लोह हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मात्र गर्भधारणे महिलांच्या शरीरामध्ये लोहाची जास्त गरज असते. तसेच मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे लोहाची शरीरामध्ये कमतरता निर्माण होते.आहारात लोहयुक्त पदार्थांचा जास्त समावेश नसल्यामुळे याचा अभाव निर्माण होतो.
लोहाची कमतरता
शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी महिलांनी त्यांच्या आहारात लाल मांस, मसूर, राजमा, बीन्स, पालक आणि भोपळ्याच्या बियांचा वापर जास्तीच जास्त करावा. तसेच अधिक कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी करून मल्टीविटामिन गोळ्या किंवा लोह सप्लिमेंट घ्यावे.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
दरम्यान, ज्या स्त्रिया मांस, अंडी खात नाहीत आणि दूध पीत नाहीत त्यांना व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते.
यामुळे अनेकदा त्याच्या कमतरतेमुळे हात-पाय बधीर होऊ शकतात, थकवा, भूक न लागणे, चालण्यास त्रास होणे, त्वचा व डोळे पिवळसर होणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात. यामुळे आहारात व्हिटॅमिन बी 12 असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.
कॅल्शियमची कमतरता
लैक्टोज असल्यामुळे अनेक महिला या दूध पिऊ शकत नाहीत. तसेच आहारात कॅल्शियमचा कमी समावेश करणे. दरम्यान, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे महिलांना ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे अनेक स्त्रियांना दात आणि हाडे यांच्या समस्या सुरु होतात.
मरीरातील ही कमतरता भरून काढण्यासाठी स्त्रियांनी आहारामध्ये दूध, दही, चीज, पालक, ब्रोकोली, एवोकॅडो, लेडीफिंगर इत्यादीं पदार्थांचा समावेश करावा. तसेच आपल्या वयाच्या ३० नंतर कॅल्शियम सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.