Benefits of kiwi : निरोगी शरीरासाठी फळे खाणे खूप महत्वाचे आहे. फळांमध्ये असलेले पोषक तत्व आपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवतात. अशातच किवी हे असेच एक फळ जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनके प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खुप गरजेचे आहे. म्हणून याला सुपरफ्रूट असेही म्हणतात.
किवीचा वापर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, रक्तदाब आणि डोळ्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी देखील केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम इत्यादींचा चांगला स्रोत आहे. जे तुम्हाला अनेक आजारांपासून लांब ठेवते. आजच्या या लेखात आपण किवी फळ खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग…
नियमित किवी खाण्याचे फायदे :-
-तसे आरोग्यासोबत किवीचा वापर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यात आढळणाऱ्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, त्वचेवर पुरळ आणि सूज कमी करून त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने त्वचा निरोगी राहते. तसेच आपली त्वचा चमकदार होते.
-किवी खाल्ल्याने शरीरात रक्त गोठण्याची समस्या होत नाही. यात अँटीथ्रोम्बोटिक (अँटी-क्लोटिंग) गुणधर्म आहेत, ज्यामुळे स्ट्रोक, किडनी आणि हृदयविकाराच्या समस्यांचा धोका कमी होतो.
-किवी व्हिटॅमिन-सीचा चांगला स्त्रोत आहे. किवीमध्ये व्हिटॅमिन-सी पुरेशा प्रमाणात आढळते. हे व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून तुमची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवते.
-बद्धकोष्ठता दूर करण्यात किवी खूप मदत करते. याचे सेवन केल्याने जुनाट बद्धकोष्ठता देखील बरी होते. त्यामुळे गॅस आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. तुम्हालाही वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर किवी तुमच्यासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते.
-किवीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होते. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. तसेच तुम्ही सारखे-सारखे आजारी पडणार नाही.
-किवी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएलचे प्रमाण कमी होते आणि एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो.