Grah Gochar 2024 : नवीन वर्षाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत, 2023 प्रमाणेच 2024 मध्येही ग्रहांमध्ये विशेष बदल पाहायला मिळणार आहेत. ज्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावर दिसून येणार आहे. जानेवारी 2024 मध्ये तीन ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या या हालचालींचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल.
काहींसाठी हे ग्रहसंक्रमण शुभ तर काहींसाठी अशुभ ठरेल. पुढील महिन्यात कोणते ग्रह आपल्या चाली बदलतील आणि लोकांच्या जीवनात बदल घडवून आणतील हे जाणून घेऊया-
31 डिसेंबरला देव गुरु मार्गी होणार आहेत. गुरु ग्रहाच्या या हालचालीचा अनेक राशींना याचा फायदा होईल. वैदिक ज्योतिषात बृहस्पति हा ज्ञान आणि स्थितीचा कारक मानला जातो. या काळात गुरु वृश्चिक, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना चांगले फळ देतील.
नंतर 2 जानेवारीला बुध मार्गी अवस्थेत असेल, तर 7 जानेवारी रोजी धनु राशीत संक्रमण कारेन. यानंतर 20 जानेवारीला पूर्वाषादा नक्षत्रात प्रवेश करेल. 30 जानेवारीलाही नक्षत्रांमध्ये बदल होईल. ज्याचा परिणाम कन्या, मकर आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर दिसून येईल, या लोकांना आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
तसेच ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीतून बाहेर पडून १५ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. जो कर्क, मिथुन आणि मेष राशीच्या लोकांना फायदेशीर ठरेल, या काळात त्यांना चांगले फळं मिळेल.
18 जानेवारी रोजी सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. आणि 12 फेब्रुवारीपर्यंत तो येथेच राहील. यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. या काळात वृषभ, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होईल.