Home Remedies : खोकल्याच्या समस्येने हैराण आहात?; मधासोबत करा ‘या’ गोष्टींचे सेवन !

Published on -

Home Remedies : हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. हळू-हळू थंडी देखील जाणवू लागली आहे. हिवाळ्याचा हंगाम येताच आजारपण सुरु होते, कारण या मोसमात वातावरण थंड असल्यामुळे, सर्दी, खोकला, घसा, यांसारखे आजार उदभवतात. या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे यांसारखे आजार होतात. म्हणूनच या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची फार गरज असते.

हिवाळ्यात अनेकदा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.  हिवाळ्यात खोकला, सर्दी, ताप सामान्य समस्या आहेत. काहीवेळेला हा त्रास इतका वाढतो की रात्रभर झोप लागत नाही. अशातच आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून अशा आजारांपासून सुटका मळवू शकता.

जर तुम्हाला खोकल्याची समस्या असेल तर तुम्ही मधाचे सेवन करू शकता. यामुळे खोकल्याची समस्या लवकर दूर होते. कारण मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. जर तुम्हाला कफाच्या समस्येपासून लवकर सुटका मिळवायची असेल तर या घरगुती उपायांचा वापर करू शकता.

मध आणि पिंपळाचे पान

जर तुम्ही हिवाळ्यात खोकल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही मधासोबत पिंपळाच्या पानाचा वापर करा. यासाठी पिंपळाच्या पानाचा ठेचून बारीक चुरा करा नंतर त्यात मध मिसळून सेवन करा. यामुळे तुम्हाला खोकल्याच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो.

मध आणि काळी मिरी

हिवाळ्यात खोकल्याची समस्या अनेकदा वाढते. अशा स्थितीत तुम्ही काळी मिरी मधासोबत सेवन करू शकता. यासाठी तीन-चार काळ्या मिरी बारीक करून त्याची पावडर मधात मिसळून सेवन करावे. यामुळे देखील तुम्हाला लवकर आराम मिळेल.

मध आणि आले

जर तुम्ही खोकल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आल्याचे मधासोबत सेवन करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आल्याचा रस काढावा लगेल, आता त्यात मध मिसळा आणि त्याचे सेवन करा.

मध आणि लवंग

यासोबतच खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लवंगाचा मधासोबत वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथमतीन-चार लवंगा भाजून घ्याव्या घ्या. मग ते बारीक करून त्यात मध आणि कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News