Google Pixel 7 वर जबरदस्त डिस्काउंट, iPhone 15 ला पण टाकले मागे

Published on -

Google Pixel 8 नुकताच लाँच झाला. या फोनच्या लॉन्चिंग नंतर आता गुगल पिक्सल 7 वर बंपर डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे ग्राहकांना हजारो रुपयांचा फायदा मिळू शकतो.

अनेक दिवसांपासून गुगल पिक्सल 7 खरेदी करण्याची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना आता खरेदीकरण्याची चांगली संधी आहे. हा डिस्काउंट केवळ 2,000 रुपयांचा फायदाच देणार नाही तर डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहक आणखी बचत करू शकतात. चला जाणून घेऊयात –

तुम्हाला कुठे व कसा मिळेल डिस्काउंट ?

डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर ही ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर दिली जात आहे, येथून ग्राहकांना गुगल पिक्सल 7 (लेमनग्रास, 128 जीबी) (8 जीबी रॅम) च्या खरेदीवर ही डील मिळू शकते. गुगल पिक्सल 7 खरेदी करण्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही. खरं तर ही सूट डिव्हाइसवर आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळी ऑफर घेण्याची गरज नाही.

गुगल पिक्सल 7 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत फ्लिपकार्टवर 41,999 रुपये आहे, परंतु त्याची वास्तविक किंमत 59,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट या स्मार्टफोन्सवर 30% डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंटनंतर ग्राहक 18000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

डिस्काउंट ऑफर्स इथेच थांबत नाहीत, तर या स्मार्टफोनवर आणखी एक ऑफर आहे. फ्लिपकार्ट या स्मार्टफोनच्या खरेदीवर 36599 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. अशा तऱ्हेने जर तुमच्याकडे एखादा जुना स्मार्टफोन असेल जो तुम्ही वापरत नाही तर तुम्ही ते एक्सचेंज करू शकता आणि गुगल पिक्सल 7 च्या या व्हेरियंटच्या खरेदीवर ही मोठी सूट मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe