Jaggery Tea : हिवाळ्यात साखरेऐवजी घ्या ‘हा’ चहा, मिळतील जबरदस्त फायदे !

Ahmednagarlive24 office
Published:
Benefits Of Drinking Jaggery Tea

Benefits Of Drinking Jaggery Tea : हिवाळ्यात मौसमी आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशास्थितीत शरीर निरोगी आणि उबदार ठेवण्यासाठी चहा खूपच फायदेशीर मानला जातो. पण तुम्ही सारखेचा चहा न घेता गुळाच्या चहाचा आहारात समावेश केला पाहिजे, गुळाचा चहा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे . 

गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आजार बरे होतात आणि सर्दीपासून देखील बचाव होतो. गुळाच्या चहाने शरीरातील थकवा तसेच पचनसंस्थाही निरोगी राहते. गुळाच्या चहामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जातात.

हा चहा प्यायला स्वादिष्ट असण्यासोबतच सर्दी, खोकला आणि फ्लूची लक्षणेही कमी करतो. हा चहा हेल्दी असण्यासोबतच वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तसे गुळाचा स्वभाव हा उष्ण असतो. अशा स्थितीत त्याचा चहा प्यायल्याने मौसमी आजारांपासून बचाव होतो. आणि आपण मौसमी आजारांपासून लांब राहतो. चला त्याच्या इतर फायद्यांबद्दल जाणून घेऊया….

-गुळाचा चहा प्यायल्याने हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि फ्लूची लक्षणे कमी होण्यास मदत होते. हे शरीराला आतून उबदार ठेवते आणि थंडीपासूनही संरक्षण देते. यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला संसर्गापासून वाचवतात आणि शरीर निरोगी ठेवतात.

-हिवाळ्यात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आपण वारंवार आजारी पडतो. गुळामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. जर तुम्हाला हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुमच्या आहारात गुळाच्या चहाचा समावेश करा.

-तुम्हालाही हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर गुळाचा चहा पिऊ शकतो. साखरयुक्त चहापेक्षा हा आरोग्यदायी आहे आणि तो प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि पोटावरील चरबीही कमी होते. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

-हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने शरीराचा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि थकवा दूर होतो. गुळाचा चहा प्यायल्याने शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

-गुळाचा चहा प्यायल्याने पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. गुळात भरपूर फायबर असते, जे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम देते. हिवाळ्यात गुळाचा चहा घेतल्यास पोटदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

गुळाचा चहा बनवण्याची पद्धत?

गुळाचा चहा बनवण्यासाठी पॅनमध्ये २ कप पाणी ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात चहाची पाने, आले, वेलची आणि दालचिनी घालून उकळवा. आता २ मिनिटांनी त्यात दूध घालून चहा चांगला उकळून घ्या. चहा उकळल्यावर त्याला गाळून कपमध्ये घ्या. आता या कपमध्ये चवीनुसार गूळ घालून मिक्स करा. तुमचा गुळाचा चहा तयार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe