Mangal Budh Yuti : नवीन वर्षात मंगळ आणि बुध ग्रहाची युती; ‘या’ 3 राशींवर पडेल पैशांचा पाऊस !

Published on -

Mangal Budh Yuti Effects : हिंदू धर्मात ग्रहांना विशेष महत्व आहे, सर्व ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली हालचाल बदलतात, ज्याचा परिणाम इतर १२ राशींवर होतो. दरम्यान नवीन वर्षात देखील ग्रहांच्या हालचालीत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. 28 डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. तर 7 जानेवारी रोजी बुध धनु राशीत प्रवेश करेल.

अशा स्थितीत जानेवारीमध्ये बुध आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकत्र एका राशीत असणार आहेत. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि सामाजिक-कौटुंबिक जीवनाचा कारक मानला जातो. तर मंगळ हे धैर्य, हिंसा, परिश्रम इत्यादींचे प्रतीक मानले जाते. या दोन ग्रहांच्या मिलनाचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. पण तीन राशींना याचा सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला पाहूया…

मीन

बुध आणि मंगळाचा संयोग मीन राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या राशीच्या लोकांना या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात लाभ होतील. कुटुंबात शांतता राहील. नशीब तुमच्या बाजूने असेल. तब्येत सुधारेल.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी जानेवारी खूप महिना शुभ मानला जात आहे. या दोन ग्रहांची युती लाभदायक ठरेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. यशाची शक्यता असेल. पगारात वाढ होऊ शकते.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि मंगळाचे मिलन शुभ राहील. व्यवसायात लाभ होईल. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe