Numerology : हिंदू धर्मात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते. तसेच, अंकशास्त्राच्या मदतीने देखील व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा आहे. जोतिषात जसे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसेच अंकशास्त्राद्वारे देखील व्यक्तीचे भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादीबद्दल सांगितले जाते.
व्यक्तीच्या जीवनात जन्मतारीख महत्वाची भूमिका बजावते. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या संख्येवर आधारित ग्रह नक्षत्राची गणना केली जाते. ज्यातून त्या व्यक्तीचं आयुष्य कसं जातंय हे कळतं. दरम्यान, लवकरच 2023 वर्ष संपणार आहे आणि 2024 सुरू होणार आहे. येत्या वर्षापासून लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. असं असलं तरी, जेव्हा-जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा लोकांना त्यांचे नवीन वर्ष कसे जाईल याची चिंता असते. अशातच आज आम्ही महिन्याच्या काही विशेष तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसे जाईल, हे सांगणार आहोत.
महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या तीन असते. जन्मतारखेची बेरीज करून मूलांक संख्या काढली जाते. याच मूलांक संख्येच्या आधारे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. आज आपण 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना 2024 हे वर्ष कसे जाईल हे सांगणार आहोत.
-मूलांक 3 क्रमांकाच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष चांगले जाणार आहे. हे लोक कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करून यश मिळवतील.
-नवीन वर्षी या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. काही नवीन काम करण्यात ते यशस्वी होतील ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.
-विवाहित किंवा प्रेमसंबंध असलेल्यांसाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे. जोडप्यांमध्ये गोडवा राहील आणि एकमेकांना डेट करणारे लोक त्यांच्या नात्याला पुढे नेऊ शकतात.
-कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण होईल आणि तुम्ही परस्पर सामंजस्याने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल.
-तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे. खरेदी केलेली मालमत्ता भविष्यात तुमच्यासाठी शुभ ठरेल.