Numerology : अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचे एक महत्वाचे शास्त्र आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला व्यक्तीबद्दल सगळ्या गोष्टी कळू शकतात. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतार तसेच भविष्य, वर्तमान आणि त्या व्यक्तीचे व्यक्तिमहत्व कसे आहे ते जाणून घेता येते.
अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो, त्याद्वारे व्यक्तीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या जातात. जन्मतारखेनुसार दोन संख्या जोडल्या जातात, त्या आधारे मूलांक काढला जातो.
मूलांकाच्या आधारे, एखादी व्यक्ती त्याच्या भावी आयुष्यात केव्हा आणि कोणत्या प्रकारच्या व्यक्तीवर प्रेम करेल किंवा लग्न करेल आणि त्याच्या जोडीदाराशी त्याचे नाते कसे असेल हे देखील कळू शकते. आज आम्ही तुम्हाला मूलांक 4 असणाऱ्या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि खूप रोमँटिक स्वभावाचे असतात.
मूलांक 4
-महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. हे लोक खूप भावनिक असतात आणि खूप बोलके देखील असतात. हे लोक खूप रोमँटिक स्वभावाचे असतात. रोमान्सच्या बाबतीत त्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही आणि ते त्यांच्या जोडीदारांवर प्रचंड प्रेम करतात. ते खूप सपोर्टिव्ह जोडीदार बनवतात. आणि ते आपल्या जोडीदारावर त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही.
-या मूलांकाच्या लोकांची विनोदबुद्धी खूप चांगली असते आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती घेणे आवडते. अनेकवेळा ते अशा गोष्टी करतात की त्यांच्याबद्दल कोणालाही धक्का बसेल. त्यांचा संवादाचा टोन खूप चांगला आहे, जो लोकांची मने जिंकतो.
-भविष्यात, ते स्वतःचा जीवनसाथी निवडतात आणि त्यांच्या जोडीदारासाठी खूप समर्पित असतात. ते न बोलता जोडीदाराच्या मनातील भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात.
-हे लोक धैर्यवान आणि निर्भय असतात आणि जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीत मागे हटत नाहीत. त्यांचा एखादा प्रिय व्यक्तीला अडचणीत आल्यास ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.
-हे लोक मनमौजी स्वभावाचे असतात आणि ते मनात येईल ते करतात. हे हट्टी आणि वेडसर स्वभावाचे असतात आणि एकदा त्यांनी एखादी गोष्ट करण्याचे ठरवले की ते पूर्ण केल्यानंतरच मागे हटतात.
-या लोकांना त्यांचे जीवन खुलेपणाने जगणे आवडते आणि त्यांचे विचार पूर्णपणे स्वतंत्र असतात. त्यांना इतरांची बंधने अजिबात आवडत नाहीत. ते नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण देखील आनंददायी ठेवतात.