Numerology : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते तसेच अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारावर सर्वकाही सांगितले जाते. व्यक्तीची जन्मतारीख त्या व्यक्तींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते. जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमहत्व, भविष्य यासर्व गोष्टी कळतात.
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल काही जाणून घ्यायचे असेल, तर ते ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींसह जन्मतारखेच्या संख्येची बेरीज करून एक अंक काढला जातो. त्याला मूलांक असे म्हणतात, मूलांकाच्या आधारेच व्यक्तीबद्दल सर्व माहिती सांगितली जाते. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत जे मनाने खूपच कुशाग्र आणि बुद्धिमान असतात.
मूलांक क्रमांक 6
-ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला होतो, त्यांचा मूळ मूलांक क्रमांक 6 असतो. या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्राच्या प्रभावामुळे ही लोकं दिसायला खूप सुंदर असतात.
-शुक्र हा वैभव देणारा ग्रह आहे असे म्हणतात. याचा परिणाम या लोकांवरही दिसून येतो. त्यांचे नशीब खूप चांगले असते, कमी काम करूनही ते प्रत्येक क्षेत्रात चांगले यश मिळवतात.
-हे लोक त्यांच्या ध्येयांबाबत खूप गंभीर असतात. त्यांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण केल्यावरच ते मानतात.
-या लोकांना आयुष्यात फार कमी समस्यांचा सामना करावा लागतो. ते कोणत्याही व्यवसायात सहभागी झाले तर त्यांना त्यात प्रगती मिळते. त्यांचा व्यवसाय सुरू करताच ते भरपूर यश मिळवतात.
-हे लोक मनाने अतिशय कुशाग्र असतात आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. क्षेत्र कोणतेही असो, त्यांची प्रतिभा नेहमीच कामी येते.
-या लोकांना आयुष्यात कमी अडचणींचा सामना करावा लागतो. या लोकांवर शुक्र ग्रहाचा विशेष आशीर्वाद असतो.