Numerology : अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो. अंकशास्त्रात, मूलांकाच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वागणे, जीवनातील चढ-उतार आणि भविष्य निश्चित केले जाते. नावानुसार ज्या प्रकारे व्यक्तीची राशी तयार होते, त्याच प्रकारे जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो. या मूलांकातून व्यक्तीबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
उदाहरणार्थ, महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो आणि या मूलांकाच्या आधारे त्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी सर्व काही निश्चित केले जाते. आज या तारखांना जन्मलेल्या लोकांच्या मूलांकाच्या आधारे आम्ही तुम्हाला त्यांचे व्यक्तिमत्व, वागणूक आणि भविष्य कसे असते ते सांगणार आहोत.
-या मूलांकाची मुले लहानपणापासूनच स्वाभिमानी आणि दृढनिश्चयी असतात. पुढे ते प्रामाणिक होतात आणि त्यांच्या नेतृत्व क्षमतेच्या जोरावर ते सर्व काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. हे लोक खूप निडर आणि धैर्यवान असतात. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत. तसेच ते कोणत्याही परिस्थितीला समोरे जाण्याची हिम्मत ठेवतात.
-साहसी स्वभावामुळे हे व्यक्ती त्यांचे घर चांगल्या पद्धतीने चालवतात. घरगुती बाबींमध्ये त्यांचा सल्ला नेहमीच घेतला जातो आणि ते नेहमी आपल्या भावंडांना मदत करतात. कुंटुंबात असे काही व्यक्ती आहेत जे त्यांचे वाईट करू इच्छितात तरी देखील ते त्यांच्या भल्याचाच विचार करतात.
-या मूलांकाचे लोक खूप संपन्न आहेत. त्यांच्या गुणवत्तेने ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि संपत्तीच्या बाबतीतही समृद्ध होतात. त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. ते त्यांच्या चैनीच्या वस्तूंवर खूप पैसा खर्च करतात.
-या लोकांचे करिअर खूप चांगले असते. ते उच्च शिक्षण घेतात आणि त्यांना संशोधन कार्यात प्रचंड रस असतो. त्यांच्या उत्साही स्वभावामुळे ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेत यश संपादन करतात. या यशामुळे त्यांना समाजात आदर मिळतो.
-या मूलांकाचे लोक पुढे जाऊन व्यवस्थापक, आयएएस, पीसीएस अधिकारी बनतात. त्यांच्याकडे खूप चांगली नेतृत्व क्षमता आहे, त्यामुळे ते राजकारणाच्या क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. ते डॉक्टर, इंजिनिअर, सर्जन आणि दंतचिकित्सक म्हणूनही चांगले करिअर करतात.