Numerology : ‘या’ तारखांना जन्मणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खूपच खास, होईल आर्थिक लाभ

Ahmednagarlive24 office
Published:
Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रामुळे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते. जसे प्रत्येक नावानुसार राशी असते, तसेच प्रत्येक संख्येनुसार अंकशास्त्रात देखील संख्या असतात. या संख्यांना भाग्यांक असेदेखील म्हटलं जातं.

आपल्याला हा भाग्यांक आपल्याला जन्मतारीखेवरूनही काढता येतो आणि याच भाग्यांकावरून आपल्याला आपले भविष्य सहज समजू शकते. दरम्यान, आजचा दिवस या तारखांना जन्मणाऱ्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

एखाद्या व्यक्तीचा जन्मदर मिळवायचा असेल तर त्याच्या जन्मतारखेचे आकडे जोडण्यात येतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 29 तारखेला झाला असल्यास तर त्याचा मूलांक 1 असणार आहे.

मूलांक 1

महिन्याच्या 1 किंवा 10 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 हा असून या लोकांचा दिवस संमिश्र जाणार आहे. तसेच कार्यक्षेत्र आणि व्यवसायात सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. तसेच कोणत्याही नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात स्पर्धा आणि विरोधकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो. तसेच हवामानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मूलांक 2

महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांचा दिवस चढ-उतारांनी भरला असतो. तुमचा व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी सावध राहणे गरजेचे आहे, परंतु तुमच्या मनात चिंतेची स्थिती राहू शकतो. इतकेच नाही तर कोणतीही नवीन योजना सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच तुमची वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवून संयमाने वागावे. तुमचे कुटुंब तुम्हाला पूर्ण सहकार्य करू शकते. घशाचे आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे.

मूलांक 3

3, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असेल. अशा लोकांचा दिवस सामान्य राहणार असून त्यांच्या व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहू शकते. तसेच तुम्हाला कोणतीही काळजी न करता नवीन काम सुरू करता येऊ शकते. तुम्हाला व्यवसायात लाभाच्या संधी मिळून कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. अशा लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. त्यांनी भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये.

मूलांक 4

4, 13 आणि 31 तारखेला जन्मणाऱ्या लोकांचा मूलांक 4 आहे. या लोकांचा दिवस व्यस्त असेल. या लोकांचे कामाचे वातावरण आणि व्यवसायासाठी वातावरण अनुकूल नसल्याने कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. तुम्हाला व्यवसायात लाभाच्या संधी खूप आहेत. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. तसेच तुमचा मानसिक तणाव त्रासदायक ठरेल.

मूलांक 5

महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मणाऱ्या लोकांचा मूलांक 5 असेल. या लोकांचा दिवस सामान्य राहणार असून नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून निर्णय घ्या. महत्त्वाच्या बाबींमध्ये, भावनिक होऊन निर्णय घेऊ नये. त्यामुळे कोणतीही नवीन कृती योजना सुरू करण्यापूर्वी चर्चा करा. तसेच तुमच्या कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

मूलांक 6

ज्यांचा जन्म महिन्याच्या 6 किंवा 24 तारखेला झाला असे अशा लोकांचा मूलांक 6 आहे. या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाणार असून कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात अनुकूलता कमी होऊ शकते. तसेच तुम्हाला नवीन समस्या निर्माण होऊ शकतात, परंतु तुम्हाला अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याने कामात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला व्यवसायात लाभ होऊ शकतो. परंतु तुम्ही कोणाशी स्पर्धा करू नये. तुम्हाला शारीरिक थकवा येऊ शकतो, मित्रांच्या भेटीगाठी होतील.

मूलांक 7

महिन्याच्या 7 किंवा 25 तारखेला जन्मणाऱ्या लोकांचा मूलांक 7 असेल. या लोकांचा दिवस आनंदात जाणार असून कार्यक्षेत्र आणि व्यवसायात अपेक्षेप्रमाणे अनुकूलता राहू शकते. तुम्हाला सहकारी आणि अधिकारी यांच्या मदतीने नवीन योजनांवर काम सुरू करता येईल. त्याशिवाय तुम्ही व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहावे. तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य मिळू शकते. तसेच तुम्हाला प्रवासाची शक्यता आहे.

मूलांक 8

महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मणाऱ्या लोकांचा मूलांक 8 असेल. या लोकांचा दिवस उत्साहाने जाऊ शकतो. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहू शकतो. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी देण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला पूर्वीपासून असणारे प्रश्न सुटू शकतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहून तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तसेच तुम्ही वाहन जरा जपून चालवणे गरजेचे आहे.

मूलांक 9

महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मणाऱ्या लोकांचा मूलांक 9 असेल. तसेच या लोकांचा दिवस यशाने भरला असेल. तुम्हाला व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहू शकते. या लोकांना व्यवसायात लाभाची दाट शक्यता आहे. तसेच तुमचे प्रेमसंबंध मधुर राहतील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होईल. तुम्हाला पोटाचे आजार त्रास देतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe