Numerology : ‘या’ लोकांसाठी खूप खास असेल आजचा दिवस; काहींना सावध राहण्याची गरज !

Ahmednagarlive24 office
Published:
Numerology

Numerology : राशीच्या आधारे भविष्य, वर्तमान याबद्दल सर्व गोष्टी कळू शकतात, अशातच अंकशास्त्र देखील व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी कळतात. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची राशी असते, त्याचप्रमाणे मूलांक संख्या देखील असते, जी जन्मतारखेच्या आधारे निश्चित केली जाते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जन्मतारखेची संख्या एकत्र जोडून त्याची मूलांक संख्या काढू शकते.

आजपासून ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे आणि आज महिन्याच्या पहिल्या तारखेला आम्ही तुम्हाला आजचा दिवस कोणत्या लोकांसाठी शुभ असणार आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना नशिबाची साथ मिळेल की नाही हे जाणून घेणार आहोत.

मूलांक 1

या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला मानला जात आहे. नवीन कामाच्या योजनांना आकार देण्यासाठी हा उत्तम काळ उत्तम असेल. या काळात तुम्हाला काही जबाबदाऱ्या मिळणार आहेत, यासाठी तुमचे मन शांत ठेवा आणि एकाग्र राहा. कौटुंबिक सहकार्य तुमच्या सोबत राहील.

मूलांक 2

या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही स्थिती चांगली दिसते. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेणे टाळा, असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मूलांक 3

या लोकांना उत्साही वाटेल आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी वातावरण मजबूत राहील. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. वाहन चालवताना काळजी घ्या तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्या.

मूलांक 4

आजचा दिवस या लोकांना संमिश्र परिणाम देईल. परिस्थितीला सामोरे जाण्यासोबतच या लोकांना समस्याही पाहायला मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी अजिबात घाई करू नका. विरोधकांपासून थोडे सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

मूलांक 5

आजचा दिवस थोडा कमी चांगला असेल. कामाच्या ठिकाणी पुढे जाताना सावध राहा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचा कोणाशीही वाद होऊ शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीची नक्कीच मदत घ्या. अन्यथा नुकसान होऊ शकते. मानसिक तणाव असू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 6

तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायाची परिस्थिती चांगली असेल, परंतु नवीन काम सुरू न केल्यास चांगले होईल. तुम्हाला अचानक लाभाच्या संधी दिसतील, परंतु भावनिक होऊन निर्णय घेऊ नका.

मूलांक 7

या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. नोकरीत परिस्थिती उत्तम राहील. व्यवसायात नफा दिसून येईल, परंतु नवीन कृती योजना राबवू नका आणि स्पर्धेपासून दूर राहा. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.

मूलांक 8

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला मानला जात आहे. तुम्ही आधीच ठरवलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांवर तोडगा निघेल. नशीब तुम्हाला साथ देईल आणि प्रेमसंबंधांमध्येही गोडवा राहील. कला आणि संगीत क्षेत्रात तुमची आवड वाढेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य आहे.

मूलांक 9

या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. नोकरीतही परिस्थिती अनुकूल राहील. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि अधिका-यांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल.आरोग्य सामान्य राहील. नवीन जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. त्यामुळे तुम्ही अवस्थ राहाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe