Numerology : वर्ष 2024 ‘या’ लोकांसाठी लकी! सर्व इच्छा होतील पूर्ण…

Numerology

Numerology : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा आहे. ज्योतिषशास्त्रात कुंडलीच्या आधारे जसे व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते त्याचप्रमाणे अंकशास्त्रात जन्मतारखेच्या मदतीने व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की, भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी.

अंकशास्त्राद्वारे जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी, एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या त्याच्या जन्मतारखेपासून मोजली जाते. ही संख्या एका ग्रहाशी संबंधित आहे. जशी त्या ग्रहाची हालचाल आहे, तशीच माणसाचे जीवन आहे.

लवकरच वर्ष 2023 संपणार आहे आणि लवकरच 2024 वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षाकडून प्रत्येक व्यक्तीच्या खूप अपेक्षा असतात. येणारे वर्ष आपल्या आयुष्यात आनंद घेऊन यावे, असे प्रत्येकाला वाटते. तुमचे वर्ष 2024 कसे जाणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही यासाठी अंकशास्त्राची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा 4 लोकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे जीवन येत्या वर्षात कसे जाणार आहे.

मूलांक 5

महिन्याच्या 5, 14, 23, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींची मूलांक संख्या 5 असते. जन्मतारखेची बेरीज करून ही संख्या काढली जाते. मूलांक 5 असणाऱ्या
लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. 2023 च्या तुलनेत, 2024 हे वर्ष खूप शुभ मानले जात आहे. या काळात तुम्ही परदेश प्रवास करू शकता. तसेच प्रेमात असलेल्या लोकांचा वेळ चांगला जाईल. अविवाहित लोकांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

मूलांक 6

महिन्याच्या 6, 15 , 24, 20, तारखेला जन्मलेल्या व्यक्तींची मूलांक संख्या 6 असते. या लोकांसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले असणार आहे. या काळात मालमत्ता खरेदीचा योग आहे. तसेच वाहन, सोने किंवा इतर महागड्या वस्तूंमध्ये पैसे गुंतवाल. तसेच आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 7

महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींची मूलांक संख्या 7 असते. या लोकांसाठी 2024 हे वर्ष सामान्य असणार आहे. काही समस्या असू शकतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. मात्र, कोणत्याही अडचणीत तुम्ही एकटे राहणार नाही, अनेक लोक तुमच्या मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभे राहतील. नवीन वर्षात तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. धार्मिक कार्यात तुमची आवड जागृत होईल आणि प्रवासाचे योग येतील.

मूलांक 8

महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींची मूलांक संख्या 8 असते. या लोकांसाठी 2024 हे वर्ष फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्ही असे चमत्कार करणार आहात की, तुमच्या आजूबाजूचे लोक स्वत: थक्क होतील. तुम्ही जुन्या समस्यांपासून मुक्त व्हाल आणि इतरांनाही त्यांच्या समस्यांमधून बाहेर काढाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe