Personality Test : स्त्रियांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरुन तिचे भविष्य समजते. तसेच तिच्या केसांवरूनही तिच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू उघडतात, असे सांगितले जाते. स्रियांच्या केसांवरुन तिच्या आयुष्यातील अनेक रहस्य उघड होतात, असे सांगितले जाते. महिलांचे केस हे केवळ त्यांच्या सौंदर्य नाही, तर तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वही प्रतिबिंबित करतात. स्त्रीच्या केसांकडे पाहून तिच्या विचारांबद्दल आणि तिच्या जीवनशैलीबद्दल अनेक गोष्टी सांगता येतात.
१. लांब केस: लांब केसांच्या महिला वास्तवाशी जोडलेल्या असतात. कमी बोलणे व जास्त काम हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र असतो. पैशाचे मूल्य त्यांना माहित असल्याने पैशाची उधळपट्टी त्या करत नाहीत. लांब केस असलेल्या महिला व्यावहारिक असतात.

२. लहान केस: लहान केस असलेल्या महिला मेहनती असतात. त्यांच्यात एक शिस्त पहायला मिळते. प्रेम आणि द्वेष हे दोन्ही गुण त्यांच्यात दिसतात. या फसव्या नसतात. त्यांचा स्वभाव सडेतोड असल्याने त्या गर्विष्ठ वाटतात. त्या स्वार्थी आणि महत्त्वाकांक्षीही असतात.
३. कुरळे केस: अशा केसांच्या महिला कलासक्त असतात. साहित्य आणि संगीतात त्यांना रुची असते. कल्पनाशक्तीत त्या जास्त रममाण होतात. त्यांना आदरातिथ्याची विशेष आवड असते. त्या सहसा दुरदृष्टीने विचार करत नाहीत.
४. पातळ आणि कमी केस: अशा महिला कठोर परिश्रम करतात. त्या कमी रोमँटिक असतात. आहे त्या परिस्थितीशी त्या जळवून घेतात. अशा स्त्रिया त्यांच्या हृदयात अनेक गुपिते दडवून ठेवतात. प्रेमात त्यांची अनेकदा फसवणूक होते.
५. काळे आणि सरळ: ज्या महिलांचे केस काळे आणि सरळ असतात त्या स्पष्टवक्त्या असतात. त्या मोकळ्या मनाच्या असतात. परंतु अनेकदा एखादा विषय त्यांना कुटुंबाशी योग्य पद्धतीने मांडता येत ना