Potato Peels Benefits : बटाट्यापेक्षाही फायदेशीर आहेत त्याच्या साली, फेकून देण्याची चूक करू नका…

Content Team
Published:
Potato Peels Benefits

Potato Peels Benefits : भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे बटाटा. बटाटा हा कोणत्याही सिजनमध्ये सहज उपलब्ध होतो. भारतातील प्रत्येक घरात तुम्हाला बटाटा दिसेलच, बटाटा खायला जितका चविष्ट आहे, तितकाच तो फायदेशीर देखील आहे. बटाट्याचे अनेक फायदे आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का? केवळ बटाटेच नाही तर त्याची सालेही अनेक गुणांनी समृद्ध असतात. जर तुम्ही या सालींचे फायदे जाणून घेतले तर तुम्ही ही साले फेकून देण्याची चूक कधीच करणार नाही.

बटाट्याच्या सालींमधे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट घटक, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, जस्त, मॅग्नेशियम इत्यादी जीवनसत्त्वे आणि खनिजे यात आढळतात. यामध्ये फायबर देखील भरपूर असते. त्वचा आणि हृदयासाठी हे फायदेशीर मानले जाते. चला याच्या आणखी फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

बटाट्याच्या सालीचे फायदे :-

-बटाट्याची साल केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. त्याचा रस टाळूवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते. तसेच केस चमकदार आणि दाट होतात.
बटाट्याच्या सालीमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आणि मानवी शरीर विविध रोगांशी लढण्यास सक्षम बनते.

बटाट्याची साल कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवते. याशिवाय हृदयासाठीही हे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बटाट्याची साल देखील चेहऱ्यासाठी वरदान नाही. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल सारखे गुणधर्म असतात. ब्लीचिंगसाठी बटाट्याची साल उत्तम मानली जाते. चेहऱ्यावर वापरल्याने डाग दूर होतात.

अशा प्रकारे वापरा बटाटा :-

स्वयंपाकासाठी

बटाट्याची साल वेगवेगळ्या प्रकारे वापरता येते. त्यातून तुम्ही चिप्स, बटाट्याची पावडर, सूप इत्यादी खाद्यपदार्थ बनवू शकता.

सौंदर्यासाठी

बटाट्याच्या सालीचाही वापर सौंदर्यासाठी करता येतो.त्याला त्वचेवर चोळल्याने पिंपल्स आणि डाग येण्याची समस्या दूर होते.हा तुकडा आणि त्याचा रस केसांवर लावल्याने केस मजबूत होतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe