Shani Gochar 2025 : शनि गोचरचा कहर!मेष आणि मीन राशीच्या आयुष्यात होणार मोठे बदल, साडेसातीवर ‘हे’ उपायच करू शकतात मात!

Published on -

Shani Gochar 2025 : हिंदू धर्मात शनिदेवाला कर्माचे फळ देणारा देव मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च 2025 रोजी शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत. या दिवशी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील. या बदलामुळे मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून दिलासा मिळेल तर मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

मेष व मीनवर साडेसातीचा प्रभाव-

मीन राशीचे लोक स्वभावाने धार्मिक आणि शांत असतात. या राशीत शुक्र ग्रह उच्चस्थानात असल्यामुळे मीन राशीच्या लोकांवर संकटांचे फारसे गंभीर परिणाम होत नाहीत. तरीही, शनिदेवाची साडेसाती सुरू असल्याने काही उपाय करणे आवश्यक आहे, जेणेकरून साधकावर शनीची कृपा राहील आणि जीवनात सौभाग्य आणि समृद्धी येईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी हनुमान चालीसा आणि आरतीचा पाठ करावा. विशेषतः मंगळवार आणि शनिवारी 5 ते 7 वेळा हनुमान चालीसा व बजरंग बाणाचे पठण केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.

शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. पाणी अर्पण केल्यानंतर पिंपळाची तीन प्रदक्षिणा घालावी आणि शनि चालीसा म्हणावी. असे केल्याने शनीची विशेष कृपा साधकावर होते.

‘या’ वस्तूंचे दान करा-

दर शनिवारी काळे तीळ, मीठ, काळ्या रंगाचे बूट किंवा चप्पल, छत्री, काळ्या वस्त्रांचे आणि अन्नाचे दान करावे. दान केल्याने शनीच्या अशुभ परिणामांपासून बचाव होतो आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात.

साडेसातीच्या काळात सोमवार व शनिवारी गंगाजलात बेलपत्र व काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा. यावेळी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास आयुष्यातील संकटे दूर होतात आणि शनिदेवही प्रसन्न होतात.

याशिवाय दर मंगळवारी हनुमानजींच्या पूजेमध्ये शेंदूर अर्पण करावा आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना हनुमानजींना सुख आणि सौभाग्याच्या प्रार्थना कराव्यात. या उपायांनी इच्छित फळ मिळते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतो.

हे सोपे उपाय नियमित केल्यास मीन राशीच्या लोकांना साडेसातीचा त्रास कमी होतो आणि जीवनात सुख, समाधान आणि यश प्राप्त होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News