Shani Vakri : शनीच्या उलट्या चालीमुळे बनतोय राजयोग, ‘या’ राशींच्या लोकांना होणार खूप मोठा फायदा

Ahmednagarlive24 office
Updated:
Shani Vakri

Shani Vakri : लवकरच कुंभ राशीमध्ये शनीची वक्री होताना आपल्याला दिसणार आहे. असे झाल्याने मूळ त्रिकोण राशीमध्ये शनि खूप शक्तिशाली असणार आहे. त्यामुळे याचा शनिचा सकारात्मक परिणाम 5 राशीवर होणार आहे. त्यांचे याच काळात नशीब बदलू शकते.

याच काळात या राशींच्या लोकांचे करिअर आणि आर्थिक स्थिती खूप चांगली असेल. परंतु याचा वाईट परिणाम काही राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. कारण शनी हा कर्म दाता आहे. त्यामुळे या राशींनी विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जाणून घेऊयात कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे.

शनि हा कर्माचा दाता असून प्रत्येकाला तो त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतो. समजा एखाद्याच्या कुंडलीत शनी जर बलवान असेल तर त्या राशीला सकारात्मक परिणाम मिळत असतात. तर दुसरीकडे, जर कुंडलीत शनी कमकुवत असेल तर व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

1. मेष

मेष रास असणाऱ्या लोकांना शनीच्या प्रतिगामीपणामुळे त्याचा लाभ होईल. तसेच त्यांना करिअरमध्ये जास्तीत जास्त फायदा दिसून येईल. परंतु त्यांना कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त मेहनत करावी लागणार असून त्यांना त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. त्यांच्या तब्येतीत चढ-उतार दिसतील.

त्यांना शारीरिक थकवा आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल. परंतु सतत मेहनत करत राहा, कारण हा शनि तुम्हाला येणाऱ्या काळात सर्व काही देईल. इतकेच नाही तर आर्थिक कामांसाठी हा काळ अनुकूल असून तुम्हाला धन आणि लाभ होईल आणि याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.

2. वृषभ

शनीच्या प्रतिगामीपणामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून हा योग ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानला जात असल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच त्यांना व्यवसायात लाभ होऊन तब्येत सुधारेल. जर या राशीच्या लोकांनी शिस्तबद्ध जीवन जगले तर त्याचा त्यांना फायदा होईल. त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येऊ शकतो. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल. तसेच त्यांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे.

3. मिथुन

मिथुन रास असणाऱ्या लोकांना शनीच्या प्रतिगामीपणामुळे भाग्याची साथ मिळणार आहे. त्यांच्या सर्व जुन्या समस्या संपून त्यांना परदेशात जाण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या शनीची प्रतिगामी स्थिती खूप चांगली मानली जात आहे.

त्यांना त्यांच्या भावंडांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. त्यांना वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नोकरीत बदली होईल आणि त्यामुळे त्यांना फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे.

4. सिंह

या राशीच्या लोकांवर याचा सर्वात जास्त प्रभाव पडणार आहे. कारण याच काळात त्यांना व्यावसायिक निर्णयात फायदा होण्याची जास्त शक्यता आहे. इतकेच नाही तर नोकरी करत असणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. इतकेच नाही तर त्यांचे वैवाहिक जीवन चांगले राहून त्यांची प्रगती होत राहील. तसेच शनीची प्रतिगामी स्थिती आर्थिक समृद्धी आणणारी असणार आहे.

5. मकर

या काळात तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या मजबूत नाही तर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होताना दिसेल. तुम्हाला तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांतून खूप आर्थिक लाभ मिळतील. या काळात तुम्ही एखाद्या नवीन नोकरीत किंवा व्यवसाय क्षेत्रातही मोठी कामगिरी करू शकता. तुम्हाला या काळात शनिदेवाच्या कृपेने नशिबाची साथ मिळेल. परंतु तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्याच्या विचारात असल्यास हा काळ अनुकूल राहील.

या लोकांनी घ्या काळजी

कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास असणाऱ्या लोकांना शनीच्या उलट्या हालचालीमुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या सर्व राशींना पुढील 5 महिने शनीच्या दृष्टीपासून सावध राहावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe