Vastu Tips : वास्तुशास्त्रामध्ये वास्तूबद्दल अनेक नियम आणि मार्ग सांगण्यात आले आहेत. तसेच तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये उठल्यापासून ते झोपेपर्यंत अनेक चुकीची कामे करत असता. त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो.
घरामधील चुकीच्या कामामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुम्हाला अनेक ठिकाणी दिसून येईल. तसेच घरामध्ये वास्तुदोष तयार झाल्याने तुम्हाला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्या निर्माण होत असतात.
घरामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवल्या पाहिजेत हे देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. जर तुम्ही सकाळची उठल्याबाबरोर काही चुकीच्या गोष्टींवर नजर टाकली तर त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे खालील गोष्टींवर चुकूनही उठल्याबरोबर नजर टाकू नका.
मोबाईल फोन
आजकाल अनेकांना सतत स्मार्टफोन पाहण्याची सवय लागली आहे. सकाळची उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतात. मात्र जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचा फुटलेला स्मार्टफोन पाहिला तर तुमच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि अनेक अडचणी निर्मण होतील.
प्राण्यांचे पोस्टर
आजकाल घरातील भिंती आकर्षक दिसण्यासाठी अनेकजण घोडे आणि इतर प्राण्यांचे पोस्टर लावत असतात. तसेच जर तुमच्या घरातील भिंतीवरील धोकादायक प्राण्यांचे चित्र तुम्ही उठल्याबरोबर पाहत असाल तर तुमच्यासाठी ते हानिकारक ठरू शकते.
रात्री जेवण केलेली खरकटी भांडी
रात्री जेवण केलेली खरकटी भांडी अनेकजण त्याचवेळी स्वच्छ करत नाहीत. सकाळची उठल्याबरोबर अनेकजण ती भांडी स्वच्छ करत असतात. मात्र उठल्याबरोबर अशी भांडी पाहणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.
बंद इलेक्ट्रिक वस्तू
जर तुमच्या घरामध्ये देखील एखादी बंद पडलेली इलेक्टरॉनिक वस्तू असेल तर ती उठल्याबरोबर पाहू नका. असे केल्याने तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे कधीही बंद पडलेले घड्याळ किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तू पाहू नका.