Vastu Tips : घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी आजच करा हे ५ उपाय, होईल पैशांचा पाऊस

Ahmednagarlive24 office
Published:
Vastu Tips

Vastu Tips : तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये पैसा टिकणार नाही. तसेच घरामध्ये सतत अशांतता निर्माण होईल. घरातील सदस्यांना अनेक समस्या निर्माण होतील. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वावरताना अनेक चुका करणे टाळले पाहिजे.

तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर घरामध्ये सतत भांडण होत असतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्याने देखील घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते.

तुम्हालाही तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही उपाय करावे लागतील. त्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारेल.

या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल

तुळशीचे रोप ईशान्येला लावा

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्व आहे. तसेच हिंदू धमरातील लोक तुळशीला पवित्र मानून तिची पूजा देखील करतात. तुमच्या घरातील तुळशीचे रोप ईशान्य दिशेला लावावे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात तुळशीचे रोप लावल्याने समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

रोज उदबत्ती लावावी

घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी उदबत्ती लावावी. तसेच शेणाच्या गौरीवर धूप लावा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल.

घरी कापूर पेटवावा

तुमच्या घरामध्ये जर सतत भांडण होत असतील आणि आणि आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असेल तर घरामध्ये तुम्ही कापूर पेटवा किंवा अगरबत्ती लावा. यामुळे तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. तसेच घरातील सदस्यांची भांडणे देखील होणार नाहीत.

पाण्यामध्ये मीठ टाकून घर पुसा

जर तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज फरशी पुसत असताल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका आणि त्यानंतर फरशी पुसून काढा. असे केल्याने घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

रोज ५ मिनिटे भजन करा

घरातील देवाची पूजा करत असताना दररोज घरामध्ये १० मिनिटे तरी भजन करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि सर्व नकारात्मक गोष्टी घरामधून निघून जातील. तसेच घरामध्ये आर्थिक तंगी देखील येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe