बाजारात अनेक ब्रँडच्या, अनेक रंगाच्या व अनेक प्रकारच्या टूथपेस्ट मिळतात. यापैकी नेमकी कोणती टूथपेस्ट चांगली? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण लहान मुले, तरुण व वृद्धांच्या दातांचे प्रकार वेगवेगळे असतात. मग प्रश्न पडतो की घरातील सर्वांना सूट होईल, अशी टुथपेस्ट कोणती? आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
बेस्ट टूथपेस्ट कशी निवडायची?
टूथपेस्ट खरेदी करताना त्यातील पीपीएम तपासण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हे टूथपेस्टमध्ये फ्लोराईड म्हणजेच सोडियम फ्लोराईडचं प्रमाण किती आहे ते सांगते. सामान्य प्रौढ व्यक्तीच्या दातांसाठी सर्वोत्तम टूथपेस्ट म्हणजे, फ्लोराईडचे प्रमाण कमी असणारी टुथपेस्ट. जर तुमच्या टूथपेस्टमध्ये 1500 पीपीएमहून कमी फ्लोराईड असेल तर ते तुमच्या दातांसाठी सुरक्षित आहे. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड कंटेंटव्यतिरिक्त, सोडियम लॉरियल सल्फेट फ्री आहे, याची खात्री करणंही आवश्यक आहे.

मुलांसाठी कोणतं टूथपेस्ट आहे बेस्ट?
लहान मुलांचे दात व हिरड्या हे दोन्हीही कोमल असतात. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. मुलांसाठी 1000 पीपीएमहून कमी प्रमाण असलेलं टूथपेस्ट घ्या, 500 पीपीएम सर्वात योग्य राहील. कारण लहान मुलांचे दात व हिरड्या हे दोन्हींची काळजी घेईल अशी टुथपेस्ट निवडावी.
निवड कशी करावी?
सहसा मेडिकेटेड टूथपेस्टमध्ये पीपीएमचे प्रमाण जास्त असते. एखादी पेस्ट विशिष्ट समस्या दूर करण्यासाठी बनवली असेल तर त्यात पीपीएमचं प्रमाण जास्त असू शकते. ज्यात पीपीएमचे प्रमाण जास्त आहे, ती दातांची स्केलिंग किंवा प्लेक साफ केल्यानंतर सेन्सेटिव्हिटी कमी करण्यासाठी 15-20 दिवसांसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण यापेक्षा जास्त काळ पीपीएम असलेली टूथपेस्ट वापरल्यास दातांचं नुकसान होऊ शकतं.
पीपीएममुळे काय नुकसान होतं?
पेस्टमध्ये फ्लोराईडचं प्रमाण जास्त असल्यास व्यक्तीला फ्लोरोसिस होण्याची शक्यता वाढते. दातांमध्ये पॅचेस होऊ शकतात तसेच हिरड्या आणि दात दोन्हीचं नुकसान होतं. हिरड्यांमधून रक्त येऊ शकते व दात सेन्सेटिव्ह होऊ शकतात. त्यामुळे घरातील सर्वांना सूट होईल अशी पीपीएम असणारी टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला डाँक्टर देतात.