कोकण ट्रिप करायीय? मग आयुष्यात एकदा तरी भेट द्या ‘या’ 5 ठिकाणी; ‘हे’ पाँईंट स्वर्गापेक्षा कमी नाहीत

Published on -

महाराष्ट्राला लाभलेली कोकण किनारपट्टी ही स्वर्गापेक्षा कमी नाही. येथील निळाशार समुद्र, अद्भूत निसर्ग आणि स्वच्छ वातावरण मनाला नवी उभारी देते. दरवर्षी हजारो पर्यटकांना कोकण किनारपट्टी आकर्षित करते. या बातमीत आपण कोकणातील 5 लोकप्रिय समुद्रकिनारे पाहणार आहोत. ज्यांना आपण नक्कीच भेट दिली पाहिजे.

1.गणपतीपुळे बीच

 

गणपतीपुळे बीच हा कोकणातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. रत्नागिरी हा स्वच्छ पाणी आणि मऊ वालुकामय किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा हिरव्यागार झाडांनी वेढलेला आहे. जेथे आपल्याला अरबी समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते. याव्यतिरिक्त पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या प्रसिद्ध गणपती पुळेचे गणपती मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात दाखवलेले गणपती मंदीर आयुष्यात एकदा तरी नक्की बसावे, असेच आहे.

2.अलिबाग बीच

मुंबईपासून जवळ असल्याने हे बीच मुंबईकरासाठी प्रसिद्ध वीकेंड गेटवे स्पॉट बनले आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग बीच हे एक प्रसिद्ध बीच आहे. येथील समद्राचे पाणी शांत आणि निर्मळ आहे. येथील समुद्रकिनारी असणारा कुलाबा किल्ला हाही एक प्रमुख आकर्षण आहे. या या किल्ल्यात समुद्रास आहोटी असल्यास पर्यटक समुद्रातून पायी जाने पसंत करतात. भारती असल्यास नाव किंवा बोटीतून जाता येते. या किनाऱ्यावरही अनेक स्पाॅट प्रसिद्ध आहेत.

3.काशीद बीच

काशीद बीच हे कोकणातील सर्वात शांत समुद्रकिनारा आहे. दरवर्षी येथे हजारो देशीविदेशी पर्यटक येतात. हा समुद्रकिनारा मुंबई आणि पुणे या दोन्हीच्या जवळ आहे. कोकणातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असल्याने ते खूपच लोकप्रिय आहे. शांत समद्रकिनारा, हिरवीगार झाडे, स्फटीकासारखे स्वच्छ पाणी, पर्यटकांना आकर्षित करते. येथे सनबाथ अर्थात सूर्यप्रकाशात स्नान करण्यासाठी खूप गर्दी असते.

4.दिवेआगर बीच

दिवे आगरचे शांत वातावरण पर्यटकांना कायम मोहित करते. येथे आल्यावर पर्यटक मग्न होऊन जातात . कोकणच्या पश्चिम किनार्‍यावर असलेले हे आश्चर्यकारक बीच आहे. क्षितीजाची विहंगम दृश्ये येथे दिसतात. हॉटेल आणि लक्झरी रिसोर्टसाठीही दिवेआगर खूपच प्रसिद्ध आहे. विलक्षण स्थानिक पाककृतीचा आनंद घेण्यासाठी व सुट्ट्या मजेत घालवण्यासाठी आपणही एकदा कुटुंबाबरोबर दिवेआगरला नक्की भेट द्यावी.

5.तारकर्ली बीच

हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नयनरम्य आणि निर्मळ समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छ पाण्यासाठी आणि पांढर्‍या वालुकामय किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि पॅरासेलिंग यांसारख्या जलक्रीडा अनुभवण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात. कोकणातील सर्वच किनाऱ्यांचे आपापले वैशिष्टे आहेत. कोकण हा एक चित्तथरारक किनारपट्टीचा प्रदेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe