पूर्वीच्या काळात पत्रव्यवहारांसाठी कबुतरांचाच वापर का केला जाई?, कबुतराच्या नैसर्गिक GPSचं रहस्य उघड!

कधीकाळी जेव्हा न मोबाईल होते, न इंटरनेट आणि न टेलिफोन तेव्हा लोकांना दूरवरचे संवाद पोहचवायचे असायचे तेव्हा ते हवेत उडणाऱ्या एका पक्ष्यावर विसंबून असत. हा पक्षी म्हणजे कबुतर. हो, हेच ते कबुतर जे प्रेमपत्रांपासून ते युद्धातील आदेशांपर्यंत सगळं आपल्या पंखांवर घेऊन माणसांपर्यंत पोहचवायचे. आज आपण वापरत असलेल्या जीपीएसपासून अनेक यंत्रणा त्याकाळी नव्हत्या, पण तरीही या … Read more

गुजरातएवढा बर्फाचा तुकडा फुटण्याच्या मार्गावर?, मुंबईसह जगभरातील शहरांना जलप्रलयाचा धोका! वैज्ञानिकांचा खळबळजनक इशारा

पश्चिम अंटार्क्टिकाच्या एका कोपऱ्यात, पृथ्वीच्या अत्यंत थंड आणि निर्जन भागात, थ्वेट्स नावाची एक हिमनदी जिचे दुसरे नाव “डूम्सडे ग्लेशियर” (Doomsday Glacier)आहे, ती आज संपूर्ण जगासाठी धोक्याचा इशारा बनली आहे. तिच्या अस्तित्वात सुरू असलेले बदल इतके गंभीर आहेत की जागतिक हवामानशास्त्रज्ञही आता भीतीने थरथर कापायला लागले आहे. कारण, ही हिमनदी जर फुटली, तर जगाचा नकाशा कायमचा … Read more

‘या’ 5 राशींवर असते श्री गणेशाची विशेष कृपा, मिळते अपार संपत्ती आणि यश!

ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांवर प्रेम करते, तसंच भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक जणावर देवाचेही आशीर्वाद असतात. पण काही राशी अशा असतात ज्यांच्यावर खास कृपादृष्टी असते, तीही श्री गणेशासारख्या देवतेची, ज्यांना बुद्धी, यश आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या आशिर्वादाने जीवनात न केवळ यश, तर शांती, संपत्ती आणि मान–सन्मानाची प्राप्ती होते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर पाच राशी … Read more

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

State Employee News

State Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक काळ सेवा देता येणार आहे. कारण की सरकारकडून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय चेंज केले जाणार अशी बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय किती? सध्या … Read more

रोहित शर्मा-विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी! 2027 च्या वर्ल्ड कपपूर्वीच…

भारतीय क्रिकेटचा आत्मा मानले जाणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या त्यांच्या कारकिर्दीच्या अत्यंत संवेदनशील वळणावर उभे आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून एक पर्व संपवलं. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे आता हे दोघं एकदिवसीय क्रिकेटमधूनही लवकरच निरोप घेणार का? बीसीसीआयने केला खुलासा भारतीय संघ … Read more

2025 मध्ये युद्ध तर 2033 मध्ये…, बाबा वेंगांची हादरून टाकणारी भविष्यवाणी!

पृथ्वीच्या भविष्यासंबंधी काही भविष्यवाणी करणारे लोक आजही जगभर चर्चेचा विषय ठरतात. त्यापैकी एक नाव म्हणजे बल्गेरियातील अंध भविष्यवक्त्या बाबा वेंगा ज्यांना “बाल्कनचे नोस्ट्रेडॅमस” म्हणून ओळखले जाते. त्यांच्या भविष्यवाण्यांनी अनेक वेळा जगाला हादरवले आहे आणि त्यांचे भाकित एकट्या देशापुरते न राहता, संपूर्ण मानवजातीच्या भवितव्याशी निगडित आहेत. कोण आहे बाबा वेंगा? बाबा वेंगांचा जन्म 1911 मध्ये झाला. … Read more

वयाच्या चाळीशी नंतर चमकते नशीब, ‘या’ 4 राशींना उशिरा पण जबरदस्त यश मिळते!

आपल्या जीवनात यशाची वेळ प्रत्येकासाठी वेगळी असते. काही जणांना लवकरच मोठं यश मिळतं, तर काहींचं नशीब उशिरा फळतं. पण जेव्हा फळतं, तेव्हा ते इतकं राजेशाही आणि स्थिर असतं की त्या प्रवासातील कष्टही विसरायला होतात. ज्योतिषशास्त्रामध्येही काही राशी अशा मानल्या जातात ज्यांचं नशीब 40 व्या वर्षानंतर अचानक पालटतं आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलतं. या राशींच्या लोकांना … Read more

1 मिनिटात 1000 राउंड फायर! जर्मनीकडून भारताला मिळणार स्कायनेक्स एअर डिफेन्स सिस्टीम, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये

भारताच्या हवाई सुरक्षेला आता एक नवे, आत्याधुनिक आणि धडकी भरवणारे शस्त्र मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर्मनीच्या Rheinmetall या नामांकित संरक्षण कंपनीने भारताला ‘Skynex’ हवाई संरक्षण प्रणाली देण्याची मोठी ऑफर दिली आहे. विशेषतः पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते. भारताच्या S-400 सारख्या भव्य प्रणालींसोबतच, लहान पण अत्यंत धोकादायक ड्रोन … Read more

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल – मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली. विखे-पाटील म्हणाले की, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे२१ … Read more

संगमनेरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू होणार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांची बैठकीत माहिती

संगमनेर- तालुक्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि विशेषतः महिलांच्या आरोग्य गरजांकडे लक्ष देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. संगमनेर नगरपालिका परिसरातील कुटीर रुग्णालयात १०० खाटांचे अत्याधुनिक सुविधायुक्त स्वतंत्र स्त्री रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सविस्तर चर्चा करताना … Read more

घराच्या बांधकामासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी विवाहित तरूणीचा छळ, राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल

राहुरी- घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निशाद आरिफ शेख (वय २७, रा. बारगाव नांदूर, हल्ली रा. मानोरी, ता. राहुरी), यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत … Read more

तरूणाने पहाटे घरात घुसून अल्पवयीन मुलीला मिठी मारत केला विनयभंग, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुरी- अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील एका परिसरात नुकतीच ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी तरुणावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह एका शिवारातील एका गावात राहते. ६ जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान पीडित मुलगी व घरातील इतर लोक घरात … Read more

20 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार ! मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign

Zodiac Sign : ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रहांचे राशी तसेच नक्षत्र परिवर्तन होत असते. शुक्र हा नवग्रहातील एक सर्वाधिक शुभ ग्रह आणि या ग्रहाचे देखील वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते. शुक्र ग्रहाबाबत बोलायचं झालं तर हा ग्रह प्रामुख्याने … Read more

फादरने दिलेले मंतरलेले तेल पिल्याने महिलेचा मृत्यू, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली कोपरगावला भेट

कोपरगाव- येथील खडकी परिसरात मंतरलेले तेल पिल्याने मृत्यू झालेल्या वनिता हरकळ प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर आनाप यांनी काल मंगळवारी कोपरगावला जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेवून चौकशी केली आहे. याबाबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी वनिता हरकळ उपचारासाठी गेलेल्या डॉ. … Read more

सरकारकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरु आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत लढा थांबणार नसल्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर- शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो मिळाल्याशिवाय शेतकरी संघटनेने सुरू केलेला लढा थांबणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी दिला. खोकर (ता. श्रीरामपूर) येथे शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचा प्रारंभ व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव काळे तर … Read more

रेल्वे विभागाच्या तटबंदीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करण्याती मा.आ. स्नेहलता कोल्हेंची मागणी

कोपरगाव- रेल्वे मार्गालगत असलेल्या राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, इरिगेशनचे रस्ते, ग्रामपंचायतीचे व शिवरस्ते या सर्वांवर रेल्वे विभागाकडून अलीकडे हद्द निश्चिती करत तटबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वापरात असलेले अनेक रस्ते अचानकपणे बंद झाल्याने मोठा वाहतूक आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी माजी आमदार … Read more

तळेगाव दिघे मार्गे बसेस नसल्याने प्रवाशांची होतेय प्रचंड गैरसोय,अहिल्यानगर-नाशिक बस त्वरित सुरू करण्याची मागणी

तळेगाव दिघे- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे नाशिक ते श्री क्षेत्र भगवानगड सुरु असलेली एकमेव एसटी बस वगळता नगर ते नाशिक अन्य बसेस फेऱ्या होत नसल्याने प्रवाशी, विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तळेगाव दिघे मार्गे त्वरित बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कारभारी दिघे … Read more

नेवासा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

नेवासा- आम आदमी पार्टी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज असून सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढणे हाच निवडणूक अजेंडा असणार आहे. तसेच कोणत्याही युतीशिवाय, पूर्णपणे स्वबळावर आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अजितराव फाटके यांनी केले. रविवारी नेवासा येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश … Read more