जेवणाची चव वाढवणाऱ्या मिठाचेही 7 प्रकार, कोणते मीठ कशासाठी वापरतात जाणून घ्या !

Published on -

आपण रोजच्या स्वयंपाकात वापरत असलेले पांढरे मीठ ही फक्त एक सुरुवात आहे. भारतीय स्वयंपाकघरात आणि जगभरातही अनेक प्रकारचे मीठ वापरले जाते. काही मीठ चवीसाठी प्रसिद्ध आहे, काही आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठी, तर काही सौंदर्योपचारांमध्ये उपयोगी पडते. चला तर मग, जाणून घेऊया जगात प्रचलित असलेल्या मीठांचे हे अनोखे प्रकार.

काळे मीठ

हे काळे मीठ प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात आढळते, हे पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्याचा स्वाद थोडा गंधयुक्त आणि तीव्र असतो, त्यामुळे अनेकदा चाट मसाल्यात आणि पचनास मदत करणाऱ्या पदार्थांमध्ये याचा वापर होतो.

दगडी मीठ

याला ‘सैंधव मीठ’ असेही म्हणतात, ते उपवासाच्या दिवशी खाण्यात वापरले जाते. कारण हे मीठ पूर्णतः नैसर्गिक खाणींमधून मिळते आणि प्रक्रिया न केलेले असते. त्यामुळे शरीरात ऍसिडीटी वाढत नाही आणि पाचनास मदत होते.

फ्रेंच मीठ

फ्रेंच मीठ म्हणजे एक अत्यंत उच्च दर्जाचे, सौम्य चव असलेले आणि महाग मीठ, जे फ्रान्समध्ये समुद्राजवळील विशेष ठिकाणी तयार होते. हे सामान्यपणे हॉटेल्समध्ये किंवा खास पदार्थांमध्ये वापरले जाते, जिथे उत्कृष्ट चव महत्त्वाची असते.

समुद्री मीठ

समुद्री मीठ हे समुद्राचे पाणी वाळवून मिळवले जाते. यामध्ये नैसर्गिक खनिजे भरपूर असतात. काही लोक याचा वापर शरीर सूज कमी करण्यासाठी, स्क्रब्स किंवा बाथ सॉल्टमध्ये देखील करतात.

लाल मीठ

लाल मीठ ज्याला ‘बोहरी मीठ’ असेही म्हणतात, त्यामध्ये नैसर्गिक लाल मातीचे अंश असतात. याचा उपयोग विशेषतः स्वच्छता आणि शुद्धतेसाठी केला जातो. पारंपरिक पद्धतीत हे मीठ घर, देव्हारा किंवा आंघोळीच्या पाण्यात घालतात.

कोशेर मीठ

कोशेर मीठ हे ज्यू परंपरेत वापरले जाणारे मीठ आहे. याचे कण मोठे आणि दाणेदार असतात. हे मीठ आयोडीन विरहित असते, त्यामुळे काही ठिकाणी त्याचा उपयोग मांस धुण्यासाठी केला जातो, तर काही ठिकाणी चवीसाठी वापरले जाते.

गुलाबी मीठ

गुलाबी मीठ, म्हणजेच हिमालयीन मीठ. हे मीठ हलकं गुलाबीसर दिसतं आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. याचा उपयोग केवळ अन्नामध्येच नव्हे तर शरीर डिटॉक्ससाठी, स्किन ट्रिटमेंट्स आणि अरोमा बाथ सॉल्ट म्हणूनही केला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!