सात्त्विकतेचा, संकल्पांचा आणि भक्तिभावाचा जो दिवस अनेकांना नवसंजीवनी देतो, तो म्हणजे एकादशी. त्यातही योगिनी एकादशी ही केवळ व्रत-उपासना करण्याची नाही, तर कर्मफळांची फळे मिळवण्याची एक अद्वितीय संधी मानली जाते. या वर्षी 21 जून 2025 रोजी येणारी योगिनी एकादशी अधिकच खास ठरणार आहे, कारण तब्बल 19 वर्षांनंतर या दिवशी खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अत्यंत शुभ संयोग तयार होणार आहे. हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवसही असेल आणि बुध ग्रह देखील याच दिवशी राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे काही राशींना आयुष्यात मोठा मोड घेण्याची संधी मिळेल.

या विशेष एकादशीला तूळ, मिथुन, कुंभ आणि धनु या चार राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे, तर कौटुंबिक आनंद, करिअरमध्ये यश आणि मानसिक समाधान यांची अनुभूती येण्याची शक्यता आहे.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांना विशेषत: करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही नोकरीत स्थिरता शोधत असाल, तर या काळात तुम्हाला हवी ती दिशा सापडेल. काहींना परदेश जाण्याची किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळू शकते, जी त्यांच्या आयुष्याला नव्या उंचीवर घेऊन जाईल.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी या दिवशी कौटुंबिक सौख्य विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. नात्यांमध्ये जवळीक वाढेल, जोडीदारासोबतचे क्षण अधिक अर्थपूर्ण ठरतील. वडिलोपार्जित संपत्तीबाबत जर काही प्रश्न प्रलंबित असतील, तर त्यातही तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
कुंभ राशीसाठी योगिनी एकादशी म्हणजे पारितोषिकाचा दिवसच. गेल्या काही महिन्यांपासून चाललेली धावपळ, अडचणी आणि आर्थिक गुंतवणुकीतून अडकलेले पैसे शेवटी तुमच्याकडे परत येतील. जे श्रम तुम्ही आजवर गुपचूप करत होतात, त्यांचं यश या काळात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना आयुष्यातील अडथळे दूर करण्याची आणि नवीन संधींचा लाभ घेण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही नवीन नोकरी, व्यवसाय किंवा संधीच्या प्रतीक्षेत असाल, तर या काळात योग्य मार्ग मोकळा होईल. जुनी आव्हाने संपून नवे क्षितिज उघडेल.