सकाळच्या शांत वेळेत आपण फारसा विचार न करता आपली रोजची दिनचर्या सुरू करतो. डोळे उघडताच मोबाइलकडे हात जातो, मग उठणं, ब्रश करणं, आणि दिवसाची धावपळ. पण या सगळ्याच्या मध्ये जर फक्त 3 सेकंद देऊन तुम्ही तुमचं हृदय कितपत धोक्यात आहे हे तपासू शकलात, तर? हो, अगदी घरबसल्या, कोणत्याही यंत्रांशिवाय आणि खर्चाशिवाय.

आज हृदयरोग ही केवळ वृद्धांची समस्या राहिलेली नाही. 30 ते 40 वयोगटातील अनेक तरुणही हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळताना दिसत आहेत. यामध्ये “सायलेंट हार्ट अटॅक” ही एक अत्यंत धोकादायक गोष्ट आहे, कारण यामध्ये ना छातीत दुखतं, ना घाम येतो, ना घाबरणं काहीच लक्षात येत नाही. आणि त्यामुळेच त्याचा फटका अधिक घातक ठरतो.
अलीकडे एका हृदयरोगतज्ज्ञाने सोशल मीडियावर एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक सोपी 3 सेकंदांची चाचणी सांगितली आहे, जी आपण रोज सकाळी करत गेल्यास हृदयाच्या सुरुवातीच्या त्रासांची जाणीव होऊ शकते. ही चाचणी कोणतीही विशेष उपकरणं न वापरता केली जाते आणि ती फार वेळही घेत नाही.
कशी कराल 3 सेकंदाची टेस्ट?
सकाळी उठल्यावर बेडवर बसा आणि दोन्ही हात सरळ डोक्याच्या वर उंच करा. ही स्थिती फक्त 3 सेकंद ठेवायची आहे. इतकं सोपं आहे. पण या क्षणांमध्ये तुमच्या शरीराचं निरीक्षण फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला छातीत जडपणा वाटतोय का? बोटांमध्ये कळा किंवा सुन्नपणा जाणवतोय का? एक हात दुसऱ्याच्या तुलनेत लवकर थकत आहे का? किंवा डोकं जड वाटतंय का?
या चाचणीमधून काहीही विचित्र लक्षात आलं, तर ते तुमच्या रक्ताभिसरणात अडथळा असल्याचं संकेत असू शकतात. विशेषतः धमन्या अरुंद होण्याची शक्यता, जी पुढे जाऊन हार्ट अटॅकचं कारण ठरू शकते. अशा परिस्थितीत तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक ठरतं.
39 वर्षीय तरुणाचा अनुभव
या चाचणीचे महत्व एका 39 वर्षांच्या तरुणाच्या उदाहरणातून स्पष्ट होते. तो दररोज हा व्यायाम करत असे. पण एक दिवस त्याला अचानक हातात थोडा थकवा आणि डोकं गरगरल्यासारखं वाटलं. त्याने ते गांभीर्याने घेतलं आणि डॉक्टरांकडे गेला. काही दिवसांत त्याला हृदयात अडथळा असल्याचं समजलं आणि त्याची शस्त्रक्रियाही झाली. जर त्याने त्या छोट्याशा संकेतांकडे दुर्लक्ष केलं असतं, तर कदाचित त्याचा जीव गेला असता.
हृदयाचं आरोग्य फक्त औषधांनी जपता येत नाही. त्यासाठी सजगता, वेळच्या वेळी तपासणी आणि तुमच्या शरीराशी प्रामाणिक संवाद हवा. रोज सकाळी ही 3 सेकंदांची तपासणी करून तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नवी सुरक्षा देऊ शकता.