कडक चहा हवा, म्हणून तुम्हीही चहा जास्त वेळ उकळता? मग ही बातमी वाचाच!

Published on -

भारतात चहा हा केवळ पेय नाही, तर एक सवय, एक भावना आणि अनेकांच्या दिवसाची पहिली गरज आहे. सकाळचा चहा म्हणजेच ऊर्जेचा पहिला घोट. पण या दररोजच्या सवयीमध्ये आपण एक अशी चूक करत असतो, जी अनेकांना माहितीच नसते आणि ती म्हणजे चहा किती वेळ उकळायचा? अनेक घरांमध्ये चहा इतका उकळवला जातो की तो औषधांपेक्षाही अधिक ‘तीव्र’ होतो, आणि त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर पडू लागतात.

चहा बनवण्याची योग्य पद्धत

आपल्याला चहा हवा असतो ताजा, चविष्ट आणि सगळा थकवा घालवणारा. पण त्यासाठी फक्त पानं चांगली असणं पुरेसं नाही, त्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची असते. नीटसा चहा बनवायचा असेल, तर पहिले पाणी उकळायला घ्या. पाणी उकळायला लागलं की त्यात चहाची पाने टाका. पण फक्त 2 ते 3 मिनिटेच उकळू द्या. त्यानंतर दूध आणि साखर टाका आणि 5-6 मिनिटांत रंग आणि चव दोन्ही विकसित होतात.

चहा जास्त उकळल्यास त्यातील टॅनिन्स आणि कॅफिन अधिक सक्रिय होतात. यामुळे शरीरात आम्लता वाढते, पोटात गॅस होतो आणि काही वेळा डोकेदुखीही जाणवते. दिवसभरात खूप वेळा चहा प्यायल्यामुळे काही जणांच्या झोपेवरही परिणाम होतो. रात्रभर डोळा लागत नाही, असा अनुभव अनेकांना येतो.

चहा जास्त का उकळू नये?

सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे, सतत जास्त उकळलेला आणि कॅफिनयुक्त चहा घेतल्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि रक्तदाब वाढण्याचा धोका संभवतो. हे विशेषतः त्या लोकांसाठी अधिक धोक्याचे असते, ज्यांना आधीच बीपी किंवा हृदयविकारासारख्या तक्रारी आहेत.

डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ याबाबत नेहमी सांगतात की दिवसातून 2 ते 3 कप चहा पुरेसा आहे. त्याहून अधिक चहा घेणं हे शरीरावर अतिरिक्त भार टाकू शकतं. विशेषतः जर तो चुकीच्या पद्धतीने बनवलेला असेल, तर त्याचे दुष्परिणाम अधिक दिसतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!