तुमचं वीकेंडचं प्लॅनिंग झालंय का? या आठवड्यात नेटफ्लिक्सवर येत आहेत 9 दमदार कथा; फॅमिली ड्रामा, थरार, प्रेमकथा आणि…

Published on -

या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काही दमदार कथा प्रदर्शित होत आहेत. प्रत्येक वेब सिरीज किंवा चित्रपटामागे एक वेगळी कथा, एक अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दडलेला आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत, सत्य घटनांवर आधारित माहितीपट आहेत, कौटुंबिक नात्यांमधली गुंतागुंत आहे, आणि अर्थातच थरारही आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काय-काय पाहायला मिळणार आहे, ते पाहुयात-

‘फॅमिलीज लाईक अवर्स’

10 जूनपासून ‘फॅमिलीज लाईक अवर्स’ ही विचार करायला लावणारी कथा स्ट्रीमिंगला येत आहे. ही एक किशोरवयीन मुलीची गोष्ट आहे, जिला तिच्या घटस्फोटित पालकांच्या भावनिक तणावात अडकून शेवटी एक निर्णय घ्यावा लागतो – तिच्या आयुष्याचा. ही कथा आपल्याला हलवून टाकते आणि कुटुंबातल्या नात्यांबद्दल पुन्हा एकदा विचार करायला लावते.

‘अनिला’

11 जूनला तीन वेगवेगळ्या कथा एकाच दिवशी तुमच्या स्क्रीनवर येणार आहेत. ‘अनिला’ ही कथा आहे एका महिलेची जी तिच्या एक्स नवऱ्याने सोडून दिल्यावर स्वतःच्या पायांवर उभी राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या आयुष्यातला संघर्ष आणि त्यातून उमलणारी आत्मनिर्भरता प्रेक्षकांच्या मनाला भिडते.

चियर्स टू लाईफ

याच दिवशी ‘चियर्स टू लाईफ’ या चित्रपटात एका मुलीला एक प्राचीन पेंडंट सापडतो आणि त्यामुळे ती इस्रायलला एक वेगळाच प्रवास सुरू करते. या प्रवासात तिला तिच्या कुटुंबातील विस्कळीत नात्यांचा सामना करावा लागतो आणि एका नव्या प्रेमकथेची सुरुवात होते.

टायटन – द ओशन गेट डिझास्टर

11 जूनलाच ‘टायटन – द ओशन गेट डिझास्टर’ हा माहितीपट देखील प्रदर्शित होतो आहे. मानवी चुकांचे परिणाम किती गंभीर असू शकतात, हे यातून समजते.

‘फुबार’

12 जून रोजी दोन जबरदस्त कथा प्रदर्शित होणार आहेत. ‘फुबार’ च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा दुसरा सीझन येत आहे, जो अ‍ॅक्शन आणि मिशनमध्ये भरपूर धक्कादायक वळणं घेणार आहे.

‘विमान’

‘विमान’ ही दुसरी कथा एका उडणाऱ्या विमानावर आधारित आहे. वीजेच्या तडाख्यानंतर संकटात सापडलेलं विमान आणि त्याचा पायलट जेव्हा एक निर्जन बेट गाठण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या प्रवासात त्याचं धैर्य आणि मानवी इच्छाशक्ती यांचं दर्शन घडतं.

‘राणा नायडू’

13 जून रोजी ‘राणा नायडू’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणा दग्गुबतीच्या अभिनयामुळे ही सिरीज आधीपासूनच चर्चेत आहे. पहिल्या सीझनच्या उत्सुकतेनंतर दुसरा सीझन आणखी गुंतागुंतीचा असेल, असे म्हटले जात आहे.

‘ग्रेज अ‍ॅनाटॉमी’

14 जूनला ‘ग्रेज अ‍ॅनाटॉमी’ या जगप्रसिद्ध मेडिकल ड्रामाचा 21 वा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सिरिज जगभरातल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. डॉक्टरांचे नाते, त्यांचे निर्णय, वैयक्तिक संघर्ष आणि जीव वाचवण्याची धडपड यामुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News