जगात प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने घडतं, पण काही लोकांना अशी खास ऊर्जा लाभलेली असते की ते जे काही करतात, त्यात यशस्वी होतात. आपल्या जन्मतारखेमधून मिळणाऱ्या एका विशिष्ट संख्येवरून आपले स्वभाव, नशीब आणि यशाचा प्रवास ठरतो, असं या अंकशास्त म्हटलं आहे. यामध्ये ‘मूलांक 5’ म्हणजेच 5 या संख्येचं स्थान वेगळंच आहे.
मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांना जन्मतारखेनुसार वेगळ्या ताकदीची ऊर्जा मिळालेली असते. जर तुमचा जन्म 5, 14, 23 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 5 ठरतो. या संख्येवर बुध ग्रहाचं अधिपत्य असतं. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, संवादकौशल्य, चपळता आणि व्यवहाराची जाण यांचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे हे लोक केवळ हुशारच नसतात, तर ते चटकन परिस्थितीचा अंदाज घेत जगासमोर स्वतःची छाप सोडतात.
अनेकदा आपल्या आयुष्यात आपण पैसा, प्रतिष्ठा आणि यश या गोष्टींमध्ये संघर्ष करत राहतो. मात्र मूलांक 5 असलेले लोक या गोष्टी सहजतेने साध्य करतात. त्यांच्या मनामध्ये एखाद्या कल्पनेचा विचार आला की ते तिला लगेच कृतीत उतरवतात. व्यावसायिक जगतात तर हे लोक विजेतेच ठरतात. त्यांचा आत्मविश्वास, लोकांशी संवाद साधण्याची शैली आणि वेगाने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे ते अनेक क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करतात.
पैशाबाबतचा दृष्टिकोन-
या लोकांचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पैशाबाबतचं दृष्टीकोन. त्यांना केवळ पैसे कमवायचे असतात असं नव्हे, तर त्यांना त्याचा योग्य उपयोग करायचाही बेत असतो. पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग शोधणं, वेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करणं आणि त्यातून मोठं आर्थिक सामर्थ्य निर्माण करणं – हे सर्व त्यांच्यासाठी साहजिकच आहे. त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन इतका तीव्र असतो की काही वर्षांतच ते स्वतःचं साम्राज्य उभं करतात.
फक्त यशस्वी व्यवसायिकच नव्हे, तर हे लोक खूप आकर्षक व्यक्तिमत्त्वाचेही असतात. त्यांचं बोलणं, वागणं, हास्य – या सगळ्यात एक खास झळाळी असते. गर्दीतही ते सहज उठून दिसतात. त्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव यामुळे लोक त्यांच्या बोलण्यात गुंतून जातात. त्यांच्या अवतीभोवती एक विश्वासाचं वलय असतं.
अशा प्रकारे, मूलांक 5 असलेल्या लोकांचं आयुष्य हे केवळ नशीबावर नाही तर त्यांच्या मेहनत, चातुर्य आणि आत्मविश्वासावर उभं असतं. ते जे काही करतात, त्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा ठसा उमटतो. म्हणूनच या लोकांना आयुष्यात यश, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळते.