घरातील उंदीरांचा त्रास संपवा, योगगुरू कैलाश यांच्या भन्नाट देशी ट्रिकने उंदरं घर सोडून पळतील!

Published on -

घरात उंदीर घुसले की, जणू घरातच संकट आले असं वाटतं. कुठूनही अचानक समोर येणारे हे उंदीर ना फक्त आपल्या स्वच्छतेला बाधा पोचवतात, तर कधी कधी ते इतके त्रासदायक ठरतात की झोपही उडते. अन्नपदार्थ कुरतडणे, कपडे-तार तोडणे आणि रात्रभर घरात फिरणं या सगळ्या गोष्टींमुळे घरातल्या प्रत्येकालाच मानसिक त्रास होतो. विशेषतः स्वयंपाकघर किंवा स्टोअरमध्ये हे दिसले, की मग घरातील स्वच्छतेबद्दल शंका निर्माण होते. अशा वेळेस अनेकजण बाजारात मिळणाऱ्या उंदरांसाठीच्या औषधांचा वापर करतात, पण त्याचे परिणाम फार काळ टिकत नाहीत.

याच समस्येवर एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगितला आहे योगगुरू कैलाश यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ एक साधा द्रव तयार करून दररोज काही ठिकाणी फवारणी केल्यास, उंदीर कायमचे घर सोडून पळून जातात. हा उपाय एकदम सोपा आणि घरात सहज उपलब्ध साहित्यांनी तयार होतो.

घरच्या घरी बनवा स्प्रे

या नैसर्गिक स्प्रेच्या तयारीसाठी लागतात काहीच घटक, एक ग्लास पाणी, दोन चमचे पुदिन्याचा रस, दोन चमचे पांढरा व्हिनेगर आणि एक चमचा लिंबाचा रस. या सर्व घटकांचं मिश्रण एका काचेच्या किंवा प्लास्टिकच्या स्प्रे बाटलीत भरायचं. तयार झालेलं हे मिश्रण घरातील उंदरांच्या हजेरी असलेल्या ठिकाणी जसं की स्वयंपाकघरातील कोपरे, कपाटामागे, डस्टबिनजवळ, किंवा भेगांमध्ये नियमितपणे फवारायचं.

या द्रवाच्या वासामुळे उंदरांना अस्वस्थ वाटतं आणि ते त्या परिसरातून दूर पळतात. पुदिन्याची तीव्रता, व्हिनेगरचा आंबटपणा आणि लिंबाचा नैसर्गिक ताजेपणा हे मिळून उंदरांसाठी एक असह्य वातावरण तयार करतं. काही दिवस ही प्रक्रिया सातत्याने केल्यास, घरातल्या उंदरांची संख्या कमालीची घटलेली दिसते.

लहान मुलं किंवा प्राण्यांसाठी हानिरहित

महत्त्वाचं म्हणजे, या उपायामध्ये कोणतेही रसायन, विषारी पदार्थ किंवा घरातल्या लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना अपायकारक गोष्टींचा समावेश नाही. त्यामुळे तो पूर्णपणे सुरक्षित आहे. घरातील वृद्ध, मुले, आणि इतर सदस्य यांच्यासाठीही हा उपाय हानिरहित आहे.

आजच्या काळात, जेव्हा अनेकजण केमिकलयुक्त गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अशा प्रकारचा देशी आणि पर्यावरणपूरक उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!