पनीरच्या वादामुळे गौरी खानचं रेस्टॉरंट चमकलं; कमाई झाली चौपट, नेमकं काय होतं ते प्रकरण?

Published on -

काही दिवसांपूर्वी किंग खान अर्थातच शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही तिच्या ‘टोरी’ रेस्टॉरंटमुळे प्रचंड चर्चेत आली होती. येथे बनावट पनीर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. पण या वादामुळे नुकसान होण्याऐवजी उलट त्याचे मार्केटिंगच झाले आणि रेस्टॉरंटच्या कमाईत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. या रेस्टॉरंटची कमाई आता चौपट झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

व्लॉगर सार्थक सचदेवच्या व्हिडिओमुळे हे सर्व प्रकरण सुरू झाले होते, ज्याने आयोडीन चाचणी करून दावा केला होता की ‘टोरी’मध्ये दिले जाणारे पनीर बनावट आहे, कारण त्यात स्टार्च आहे. त्याच्या चाचणीनुसार पनीर काळे पडले, ज्यामुळे त्याने रेस्टॉरंटवर थेट आरोप केला. मात्र, ‘टोरी’च्या शेफ स्टीफन गद्दी यांनी हा दावा फेटाळला आणि खुलासा केला की आयोडीन चाचणीने केवळ स्टार्च दाखवते – हे पनीर बनावट आहे हे ठरवण्यासाठी हे अपुरी चाचणी पद्धत आहे.

या वादावर रेस्टॉरंटने अधिकृत निवेदनही दिले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या काही पदार्थांमध्ये सोया बेस्ड घटक असतात, जे आयोडीन चाचणीत असा परिणाम देऊ शकतात. त्यांनी यामध्ये कोणताही बनावटपणा नसल्याचे सांगत रेस्टॉरंटच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर ते कायम भर देतात, असे स्पष्ट केले.

या साऱ्या गोंधळाचा परिणाम मात्र सकारात्मक झाला. शेफच्या म्हणण्यानुसार, वादानंतर ग्राहकांची उत्सुकता वाढली आणि त्यामुळे रेस्टॉरंटला अधिक प्रसिद्धी मिळाली. शेफ स्टीफन गद्दी म्हणाले की, “जेव्हा तुम्ही योग्य असता, तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरजच नसते.” त्यांनी असेही सांगितले की त्यांना Instagram वर नव्याने अनेक फॉलोअर्स मिळाले आणि व्यवसायाला वेग मिळाला.

YouTuber सार्थकने शेवटी आपली पोस्ट डिलीट केली. त्याला स्पष्टीकरण देण्यात आले आणि त्यानेही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर मात्र लोक दोन भागांत विभागले गेले – काहींनी सार्थकचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली की केवळ लॅब चाचणीशिवाय रेस्टॉरंटची प्रतिमा खराब करणे चुकीचे आहे.

टोरी रेस्टॉरंट

‘टोरी’ हे रेस्टॉरंट 14 फेब्रुवारी 2024 रोजी व्हॅलेंटाईन डे दिवशी लाँच करण्यात आले होते. पाली हिल येथे स्थित हे रेस्टॉरंट आशियाई-फ्यूजन खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या इंटीरियरपासून ते पनीर टिक्का, सुशी, थाई करी अशा मेनूपर्यंत, सर्व काही आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!