खायचे तर नसतात, मग हत्तीचे दोन बाहेर आलेले दात नेमके कशासाठी?, हत्ती याचा वापर कसा आणि कुठे करतात? जाणून घ्या!

Published on -

मनुष्याचे दात हे अन्न चावण्यासोबतच सौंदर्यदृष्ट्याही तितकेच महत्वाचे असतात. समोरील दात पडलेले असतील तर चेहरा जरा कुरूपच दिसू लागतो. त्यामुळे दातांना शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग मानला जाते.पण हत्ती पाहिल्यावर एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो त्याचे ते मोठे, बाहेर आलेले दात शेवटी वापरले तरी कशासाठी जातात? कारण ना ते काही चावण्यासाठी वापरले जातात, ना ते आपण रोजच्या दातांसारखे दिसतात. तर मग, या भल्या मोठ्या प्राण्याला हे दात नक्की कशासाठी लागतात?

हत्ती, म्हणजे जंगलातील खऱ्या अर्थाने राजा. वजन जवळपास 6,000 किलोपर्यंत आणि शरीर एवढं बलाढ्य की कुठलाही दुसरा प्राणी सहज त्याच्यासमोर उभा राहू शकत नाही. त्याच्या शरीररचनेत एक वेगळीच गोष्ट लक्ष वेधून घेते, ती म्हणजे त्याचे दोन पुढील, बाहेर आलेले दात. यांनाच आपण “दंत” किंवा “Tusks” म्हणतो.

 

हत्तीचे बाहेर आलेले दात

या दातांचा उपयोग मात्र तुम्हाला थोडा आश्चर्यचकित करू शकतो. हत्तीचे हे दात अन्न चावण्यासाठी नसतातच, तर ते त्याच्या रोजच्या जंगलातील जीवनात अनेक प्रकारे उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, जेव्हा हत्तीला जमिनीत पाणी शोधायचं असतं, तेव्हा हेच दात त्याचं साधन बनतात. तो त्यांच्यामुळे खोल खड्डा खोदतो आणि जमिनीखालचं थंड पाणी मिळवतो. याचप्रमाणे, जेव्हा तो झाडांची साल खाण्यासाठी काढतो, तेव्हाही हे दात कामी येतात.

पण हत्तीचे हे दात केवळ उपयुक्ततेपुरतेच मर्यादित नाहीत, ते त्याचं संरक्षणाचं शस्त्रही असतात. जंगलात स्पर्धक प्राणी किंवा दुसरा नर हत्ती समोर उभा ठाकला, की हेच दात धाक दाखवण्यासाठी वापरले जातात. जेव्हा हत्ती रागात असतो, तेव्हा तो हे दात वापरून आक्रमणसुद्धा करू शकतो.

हत्तीच्या दातांचे वैशिष्ट्य

सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हे दात आयुष्यभर वाढत राहतात. हत्ती जितका मोठा होतो, तितके त्याचे दातही अधिक भव्य होतात. त्यामुळे या दातांत फक्त ताकद नाही, तर हत्तीच्या आयुष्याची एक महत्त्वाची कहाणी लपलेली असते. त्याची जीवनशैली, त्याचे शिकारावरील नियंत्रण, त्याचे संरक्षण आणि अगदी त्याची सामाजिक ओळखसुद्धा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!