Richest Country : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आपला देश जलद गतीने विकसित होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान आज आपण जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांची यादी पाहणार आहोत. खरंतर, जगातील देशांची श्रीमंती मोजण्यासाठी अनेक निकष वापरले जात आहेत. मात्र यातील सर्वात विश्वासार्ह मापदंड आहे प्रति capita सकल राष्ट्रीय उत्पादन (GDP per capita). जे की Purchasing Power Parity (PPP) नुसार अड्जस्ट केले जाते. जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे स्थानिक खरेदी शक्ती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती विचारात घेऊन हे मापदंड देशाच्या आर्थिक उत्पादनाचे आणि तेथील नागरिकांच्या राहणीमानाचे मूल्यांकन करत असते. दरम्यान आज आपण IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार 2025 मधील जगातील सर्वात श्रीमंत देशांची यादी जाणून घेणार आहोत. ही यादी जीडीपी पर कॅपिटावर आधारित आहे.
जगातील टॉप 10 श्रीमंत देश
लक्झेंबर्ग : या देशाची लोकसंख्या फक्त 6.5 लाख एवढी आहे. या देशाची GDP प्रति capita (PPP) 154,910 डॉलर एवढी आहे. हा देश जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत येतो. हा युरोपातील एक छोटासा देश आहे. हा देश आपल्या मजबूत बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या देशातील आयकर फारच कमी आहे. तसेच, या देशाने परदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल धोरण विकसित केले आहे. यामुळे हा देश जागतिक आर्थिक केंद्र बनलाय. या देशातील उच्च राहणीमान, उत्कृष्ट शिक्षण आणि आरोग्य सुविधा यामुळे हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.

सिंगापूर : हा देश देखील जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांपैकी एक आहे. सिंगापूर हा आशियातील सर्वाधिक श्रीमंत देशांपैकी एक आहे. या देशाची लोकसंख्या 5.7 दशलक्ष इतकी असून येथील GDP प्रति capita (PPP) 153,610 डॉलर इतकी आहे. हे एक प्रमुख आर्थिक केंद्र आहे, जे व्यापार, वित्त आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगांसाठी ओळखले जाते. हा देश आपल्या भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या देशात व्यवसायासाठी अनुकूल असे धोरण तयार करण्यात आले आहे.
मकाओ (SAR) : आशियातील आणखी एक श्रीमंत देश म्हणजे मकाओ. या देशाची GDP प्रति capita (PPP) 140,250 डॉलर इतकी आहे. या देशाची लोकसंख्या फक्त 6.7 लाख एवढी आहे. या देशाला आशियातील लास वेगास म्हणून ओळखले जात आहे. या देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. सोबतच याची इकॉनॉमी जुगार उद्योगावर सुद्धा अवलंबून आहे. या देशातील करमुक्त धोरण आणि पर्यटन यामुळे हा देश प्रचंड श्रीमंत बनलाय.
आयर्लंड : आयर्लंड हा देश देखील श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट होतो. या देशाची GDP प्रति capita (PPP) 134,000 डॉलर इतकी आहे. या देशाची लोकसंख्या ही 5.1 दशलक्ष इतकी आहे. या देशाने कमी कॉर्पोरेट कर दर आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे जागतिक कंपन्यांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. या देशात अनेक नाविन्यपूर्ण उद्योग वसलेले आहेत. या देशात नोकरदार वर्गाला चांगला पगार मिळतोय आणि यामुळे येथील राहणीमान देखील उच्च दर्जाचे आहे.
कतार : कतार या देशाची लोकसंख्या तीन दशलक्ष इतकी असून हा देखील जगातील सर्वाधिक श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. याची GDP प्रति capita (PPP) 121,610 डॉलर इतकी आहे. या देशाची अर्थव्यवस्था तेलाच्या आणि नैसर्गिक वायू साठ्यांवर अवलंबून आहे. या देशाची लोकसंख्या फारच कमी आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने सुद्धा आहेत यामुळे या देशाचे प्रति capita उत्पन्न खूप जास्त आहे.
नॉर्वे : जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत नॉर्वे या देशाचा सुद्धा समावेश होतो. या देशाचे GDP प्रति capita (PPP) 107,890 इतके आहे. या देशाची लोकसंख्या अंदाजे 5.5 दशलक्ष म्हणजे 55 लाख इतकी आहे. या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेल आणि वायू निर्यातीवर अवलंबुन आहे. याशिवाय, या देशाने आपल्या संपत्तीचे व्यवस्थापन जगातील सर्वात मोठ्या सॉव्हरेन वेल्थ फंडद्वारे केली आहे, ज्यामुळे येथील राहणीमान आणि सामाजिक कल्याण सुविधा उच्च दर्जाच्या आहेत अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.
संयुक्त अरब अमिराती (UAE) : या देशाची लोकसंख्या फक्त 95 लाख एवढी आहे. मात्र याची GDP प्रति capita (PPP): 82,000 डॉलर इतकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. याची अर्थव्यवस्था तेल आणि नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे, परंतु गेल्या काही वर्षांत येथे पर्यटन, रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही प्रगती झालेली दिसते. दुबई आणि अबुधाबी ही जागतिक आर्थिक केंद्रे याच देशात आहेत. अलीकडे दुबई हे जगातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. या देशात भारतीयांची संख्या देखील उल्लेखनीय आहे.
सॅन मारिनो : या देशाची लोकसंख्या फक्त 34 इतकी असल्याची माहिती समोर आली आहे पण याची GDP प्रति capita (PPP) 86,989 डॉलर एवढी आहे. ही एक युरोपियन कंट्री आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत देशात या देशाचाही नंबर लागतो. पर्यटन, बँकिंग आणि कमी कर धोरणांमुळे हा देश श्रीमंत बनला आहे. स्थिर अर्थव्यवस्था आणि उच्च राहणीमान यामुळे या देशाला श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
युनायटेड स्टेट्स : युनायटेड स्टेट्सची लोकसंख्या अंदाजे 34 कोटी इतके असून याची GDP प्रति capita (PPP) 89,680 डॉलर इतकी आहे. युनायटेड स्टेट्स देखील जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत येतो. ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, जी तंत्रज्ञान, वित्त, मनोरंजन आणि उत्पादन क्षेत्रातील वैविध्यामुळे पुढे आली आहे. मोठ्या लोकसंख्येमुळे प्रति capita GDP कमी दिसते, परंतु एकूण GDP मध्ये हा देश अव्वल स्थानी आहे. एकूण जीडीपी मध्ये आपल्या भारताचा सुद्धा पहिल्या पाच देशामध्ये समावेश आहे. मात्र आपल्या देशाची लोकसंख्या अमेरिकेच्या तुलनेत फार मोठी आहे.
स्वित्झर्लंड : या देशाची लोकसंख्या फक्त 87 लाखाच्या आसपास आहे. पण याची GDP प्रति capita (PPP) 82,794 डॉलर इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. हा देश बँकिंग, फार्मास्युटिकल्स आणि उच्च-गुणवत्तेच्या निर्यातीसाठी फारच प्रसिद्ध आहे. येथील स्थिर राजकीय व्यवस्था आणि उच्च राहणीमान यामुळे हा देश जगातील टॉप 10 श्रीमंत देशांच्या यादीत आपले स्थान पक्के करतो.
भारत कितव्या स्थानी आहे?
2025 मध्ये भारताची GDP प्रति capita (PPP) अंदाजे 11,940 डॉलर इतकी राहिली आहे, ज्यामुळे आपला देश श्रीमंत देशांच्या यादीत 124 व्या स्थानावर आहे. म्हणजेच आपला भारत देश टॉप 50 देशांच्या यादीत सुद्धा समाविष्ट नाही. खरेतर भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, अलीकडेच आपल्या देशाने जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान पटकावला आहे. परंतु आपल्या देशाची 140 कोटी लोकांची लोकसंख्या देशाचे प्रति capita उत्पन्न कमी करते. तथापी, अलीकडील काही वर्षांमध्ये आपल्या देशाने माहिती तंत्रज्ञान, सेवा, कृषी आणि उत्पादन क्षेत्रात लक्षणीय प्रगती केलेली आहे. मात्र असमान उत्पन्न वितरण आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे प्रति capita संपत्ती फारच कमी राहिली आहे.