भारताची लॉटरी! अंदमानमध्ये सापडला जगातला एक महाकाय तेल भंडार, पाहा काय-काय फायदे मिळणार?

Published on -

भारताच्या ऊर्जा क्षेत्रात सध्या एक मोठी आशेची किरण उमटली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तुफान वाढ होत असतानाच, भारताला आपल्या सागरी हद्दीत एक संभाव्य तेलखजिना सापडल्याची माहिती समोर आली आहे. तेलासाठी इतर देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला भारत, आता स्वतःच्या संपत्तीच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकू शकतो, अशी शक्यता या घडामोडींमधून व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, अंदमान समुद्रात कच्च्या तेलाचा मोठा साठा सापडल्याची चिन्हं आहेत आणि सध्या या ठिकाणी उत्खननाचे काम सुरू आहे. ही केवळ शक्यता नसून, एक प्रकारचं यशस्वी पाऊल असल्याचे संकेत त्यांच्या मुलाखतीतून मिळतात. त्यांनी यामधील संभाव्य साठ्याची तुलना थेट दक्षिण अमेरिकेतील गयाना देशातील तेलसाठ्याशी केली आहे.

अर्थव्यवस्थेत होणार मोठा बदल?

गयानाच्या तेलसाठ्यात सुमारे 11.6 अब्ज बॅरल कच्चं तेल आणि वायू असल्याचा अंदाज आहे. जर भारतालाही असाच साठा अंदमानच्या सागरी हद्दीत सापडला, तर केवळ ऊर्जाक्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतही मोठा क्रांतीकारी बदल होऊ शकतो. पुरींच्या मते, सध्या भारताची अर्थव्यवस्था सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे, पण या तेलसाठ्याच्या जोरावर ती तब्बल 20 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकते, म्हणजे जवळपास पाचपट वाढ.

भारत सध्या त्याच्या 85% कच्च्या तेलाची गरज इतर देशांकडून पूर्ण करतो. यामध्ये रशिया, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे जागतिक राजकारणातील संघर्ष विशेषतः इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव भारताला तेलाच्या किंमतीच्या बाबतीत अस्थिरतेकडे ढकलतो. सध्या अशी शक्यता आहे की, जर हा संघर्ष आवरता आला नाही, तर कच्च्या तेलाची किंमत 150 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते. अशा परिस्थितीत, भारताला मिळालेला तेलसाठा केवळ आर्थिक नाही, तर राजनैतिकदृष्ट्याही फार महत्त्वाचा ठरू शकतो.

…तर इंधनदरात होईल घसरण?

या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारताच्या स्वतःच्या सागरी क्षेत्रात सापडलेल्या या शक्यतांच्या खजिन्याकडे केवळ उद्योगजगतच नाही, तर सामान्य नागरिकांचंही लक्ष लागून राहिलं आहे. जर हे उत्खनन यशस्वी ठरलं, तर देशाचं नशीब अक्षरशः क्षणार्धात बदलू शकतं.श ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करू लागेल, इंधन दरांवरचा ताण कमी होईल आणि भारताची जागतिक आर्थिक स्थैर्यातली भूमिका अधिक सशक्त होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!