पावसाळा सुरू झाला की त्याच्या गारव्याबरोबरच काही छोट्या-मोठ्या त्रासांचाही सामना करावा लागतो. त्यात सर्वात जास्त डोकेदुखी ठरते ती म्हणजे घराच्या भिंतींमध्ये येणारा ओलावा. एकीकडे बाहेर सतत पाऊस, आणि घरात भिंती भिजल्यासारख्या दिसायला लागल्या की, घरात कितीही स्वच्छता ठेवली तरी एक विचित्र वास, डाग आणि बुरशी यामुळे सगळं वातावरण जड वाटायला लागतं. पण काळजी करू नका, काही सोपे घरगुती उपाय या समस्येला सहज दूर करू शकतात.

कडुलिंबाची पाने आणि लवंग
ओलावा सहसा त्या ठिकाणी अधिक दिसून येतो जिथे हवाचालना कमी असते. बंद दरवाजे, खिडक्या, विशेषतः बाथरूम आणि स्वयंपाकघरात जर योग्य एक्झॉस्टची सोय नसेल, तर तिथे सतत ओलसरपणा निर्माण होतो. म्हणूनच घर बांधताना किंवा सजवताना, योग्य व्हेंटिलेशनवर भर देणं फार महत्त्वाचं ठरतं. शक्य असल्यास दिवसातून काही वेळ घराच्या सर्व खिडक्या उघडून ठेवाव्यात. त्यामुळे घरात ताजी हवा खेळती राहते आणि ओलसरपणाचा त्रास कमी होतो.
भरड मीठ
घरात जेवढा स्वयंपाकाच्या साहित्याचा उपयोग आपण अन्न तयार करताना करतो, तेवढाच उपयोग तो इतर गोष्टींसाठीही होतो, हे बऱ्याच जणांना माहीत नसते. उदाहरणार्थ, भरड मीठ. तुम्ही मीठ एका लहान वाटीत घेऊन ती ओलसर कोपऱ्यात ठेवलीत, तर काही दिवसांत ते भिंतीतील आणि हवेमधील ओलावा शोषून घेते. ओलसर वाटलेलं मीठ बदलत राहिलं, की छोट्या खोल्यांत ओलावा लक्षणीयरीत्या कमी होतो.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे स्वयंपाकात वापरणारे घटक घराच्या स्वच्छतेतही मोलाचे ठरतात. बेकिंग सोडा ओलसरपणामुळे येणारा वास शोषतो, तर व्हिनेगर नैसर्गिक बुरशीनाशक आहे. हे दोघेही वापरणं अगदी सोपं आहे. थोडं व्हिनेगर आणि पाणी मिसळून त्या मिश्रणाचा स्प्रे तयार करा आणि तो भिंतीवर फवारा. थोडा वेळ थांबून, कोरड्या कपड्याने पुसून टाका. बेकिंग सोडा फक्त थोडा शिंपडा आणि नंतर व्हॅक्यूमने स्वच्छ करा. तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.
कडुलिंबाची पाने आणि लवंग
पावसाळ्यात भिंतींवर बुरशीसुद्धा खूप वाढते. अशावेळी कडुलिंबाची पाने आणि लवंग हे आयुर्वेदीय उपाय उपयोगी पडतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी भिंतीवर वापरल्यास बुरशी कमी होते. तसेच, काही लवंगा एका सुती कापडात गुंडाळून ओलसर जागेजवळ ठेवल्यास तिथला वास आणि बुरशी दोन्ही दूर होतात.
जर ओलसरपणाची पातळी खूपच जास्त असेल, आणि घरगुती उपाय अपुरे वाटू लागले, तर शेवटी उपाय म्हणून वॉटरप्रूफिंग पेंट्स किंवा सीलंट वापरणे गरजेचे ठरते. हे उत्पादन भिंतीच्या पृष्ठभागावर एक संरक्षक थर तयार करतं, ज्यामुळे पावसाचे पाणी आत जाऊ शकत नाही. विशेषतः घराच्या बाहेरील भिंतींसाठी हा उपाय खूप उपयोगी ठरतो.