Jackfruit Day : हाय ब्लड प्रेशर, पचन ते हृदयरोग… फणसाचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या!

Published on -

आज 4 जुलै रोजी जगभरात’फणस दिन’ साजरा केला जातोय, आणि त्यानिमित्ताने या आगळ्यावेगळ्या फळाच्या आरोग्यदायी बाजूंकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपल्या परंपरेत आणि स्वयंपाकघरात फणसाचं स्थान वेगळंच आहे. खासकरून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटका, गोवा अशा भागात तर हे फळ घराघरात वापरलं जातं.

काही जण फणसाला शाकाहारी लोकांसाठी मांसाहारी पर्याय मानतात. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण ते खरं आहे. फणसाचा पोत, त्याची चव आणि भरपूर प्रथिने असलेलं हे फळ एक नैसर्गिक प्रोटीनचा स्त्रोत बनतो. त्यामुळे जे मांसाहार टाळतात, त्यांच्यासाठी फणस हा एक उत्तम पर्याय आहे.

फणसामध्ये फायबर, जीवनसत्त्व A, C आणि विविध अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. विशेषतः पचनाच्या समस्यांवर त्याचा खूप प्रभावी उपयोग होतो. त्यातील फायबर आतड्यांना स्वच्छ ठेवण्याचं काम करतं, बद्धकोष्ठता दूर करतं आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची वाढ वाढवतो. ग्रामीण भागात तर फणसाच्या बिया भाजून किंवा उकडून खाल्ल्या जातात आणि त्या पचनासाठी अधिक गुणकारी ठरतात.

फणसाचे फायदे

पण फणसाचं महत्त्व इतक्यावरच थांबत नाही. त्याचे हृदयासाठीही फायदे आहेत. यामध्ये असलेले नैसर्गिक पोटॅशियम घटक रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्यात कोलेस्टेरॉल जवळपास नसतोच आणि चरबीचं प्रमाणही खूप कमी असतं. त्यामुळे ज्यांना हृदयाच्या आजारांची भीती वाटते, त्यांनी फणसाचा आहारात आवर्जून समावेश करावा.

एकीकडे आरोग्य फायदे, तर दुसरीकडे फणसाचं पर्यावरणीय महत्त्वही तितकंच मोठं आहे. फणस ही अशी वनस्पती आहे जी कमी पाण्यातही तग धरते आणि कोणत्याही खास रासायनिक खतांशिवाय भरपूर उत्पादन देते. म्हणजेच, ही पर्यावरणपूरक फळे आहेत जी हवामान बदलाच्या काळात टिकून राहू शकतात.

वजन कमी करण्यासही फायदेशीर

वजन कमी करण्यासाठीही फणस फायदेशीर ठरतो. कारण यामध्ये कॅलरीज कमी असतात, फायबर जास्त असतो, त्यामुळे जेवणानंतर दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूकही नियंत्रित राहते. फणस खाल्ल्याने सतत खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे वजन वाढण्याचं प्रमाण कमी होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!