बहुतांश लोकांना माहित नसेल एसीचा ‘हा’ सिक्रेट मोड, जो वीज बिल थेट 50% कमी करतो!

Published on -

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की घरात ओलावा आणि चिकटपणा जाणवू लागतो. अशा वेळी एसी लावल्याशिवाय पर्यायच उरत नाही. पण दर महिन्याला येणाऱ्या वीज बिलाची भीती आणि एसीचा अवाजवी वापर यामुळे कित्येकजण अस्वस्थ होतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या एसीमध्ये एक असा छुपा मोड आहे, जो वापरला तर घरातला ओलावा नाहीसा होतो आणि वीजेचे बिलही अर्ध्यापेक्षा कमी येऊ शकते?

‘ड्राय मोड’

खूप लोकांना माहितीच नसते की त्यांच्या एसीमध्ये ‘ड्राय मोड’ नावाचा एक पर्याय असतो. तुमच्या रिमोटवर तो पाण्याच्या थेंबासारख्या चिन्हाने दर्शवला जातो. या मोडचा मुख्य उद्देश म्हणजे खोलीतील आर्द्रता कमी करणे, म्हणजेच ओलसरपणा दूर करणे आणि तेही तापमान फारसे न बदलता. पावसाळ्यात जेव्हा हवामान फार गरम नसते पण घरात गारवा असूनही दमटपणा असतो, तेव्हा ‘ड्राय मोड’ खूप उपयोगी ठरतो.

ड्राय मोड सुरू केल्यावर एसीचा कॉम्प्रेसर फक्त गरजेनुसार चालतो आणि पंख्याचा वेगही मंद असतो. त्यामुळे तो हवा थंड करत नाही, तर त्या हवेतला ओलावा शोषून घेतो. त्यामुळे खोलीतील वातावरण थोडक्यात थंड, कोरडे आणि आरामदायक बनते. विशेष म्हणजे, कमी वेळ कॉम्प्रेसर चालल्याने वीजेची मोठी बचत होते.

कधी वापरावा हा मोड?

जेव्हा पावसाचे दिवस असतात, बाहेर सतत धुके किंवा पाऊस पडतो, आणि घरात आर्द्रतेमुळे भिंती ओलसर वाटतात, कपड्यांमध्ये घाण वास येतो, तेव्हा हा मोड वापरावा. कधी कधी खोलीत गारवा असतो पण तरीही घाम येतो किंवा दमटपणा जाणवतो त्या वेळी ड्राय मोड चालवणे अत्यंत फायदेशीर ठरते.

ड्राय मोड फार वेळ लावू नये. 1 ते 2 तास पुरेसे असतात. कारण हवा खूप कोरडी झाली, तर त्वचा कोरडी पडू शकते, डोळे चुरचुरतात आणि सर्दी होण्याची शक्यता वाढते. म्हणून एसी चालू असताना खिडक्या-दारे बंद ठेवावीत, म्हणजे बाहेरचा ओलावा पुन्हा आत येणार नाही.

वीज बिल खरंच कमी होते?

या मोडमध्ये कॉम्प्रेसर फार वेळ चालत नाही आणि थंड तापमान गाठण्याची गरजही नसते. त्यामुळे साधारण मोडमध्ये 1 तासात जितकी वीज लागते, त्याच्या निम्म्यावर ड्राय मोड काम उरकतो. म्हणूनच ते वीज बचतीचं गुपित ठरतं.

ज्या घरात सतत ओलावा असतो, तिथे भिंतीवर बुरशी वाढते, कपडे कुजतात आणि घरात एक विचित्र वास येतो. ड्राय मोड याच समस्येवर मात करतो. हवा कोरडी ठेवल्यामुळे अशा बुरशीचा फैलाव थांबतो आणि आरोग्यही सुरक्षित राहतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!