बापरे! रस्ता खोदताना सापडलं असं काही की, रिकामं करावं लागलं संपूर्ण शहर; वाचून तुम्हीही हादरून जाल

जगात अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या पाहिल्यानंतर क्षणभर आपण थक्क होऊन जातो. डोळ्यांदेखत घडलेली गोष्ट खरी आहे की नाही, यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. असाच काहीसा अनुभव सध्या जर्मनीतील कोलोन शहरातील नागरिकांनी घेतला. रस्त्याचं काम सुरू असताना जमिनीतून काहीतरी विचित्र आणि भयंकर वस्तू सापडली, जी पाहून पूर्ण शहरच हादरलं आणि एकच धावपळ उडाली.

कोलोन शहरातील घटना

कोलोनमध्ये नेहमीप्रमाणे रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. मशीनने खोदकाम करत असताना, एका कामगाराला मातीखालून काहीतरी लोखंडी भाग चमकताना दिसला. प्रथम वाटलं, काही जुनं यंत्र असेल किंवा बांधकामात वापरलेली वस्तू असेल. पण जेव्हा अधिकाऱ्यांना बोलावून त्याची पाहणी झाली, तेव्हा समोर आलं की ही वस्तू काही साधी नाही, तर थेट दुसऱ्या महायुद्धात वापरलेला आणि आजही जिवंत असलेला बॉम्ब आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

अशा प्रकारचा जीवंत बॉम्ब सापडणं म्हणजे कोणत्याही शहरासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे कुठलाही धोका टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण एक किलोमीटरचा परिसर तातडीनं रिकामा केला. घरं, शाळा, हॉटेल्स, संग्रहालयं… सगळीकडून लोकांना बाहेर काढण्यात आलं. सुमारे 20,500 नागरिकांना एका रात्रीत आपलं घर सोडावं लागलं. कुणी मुलांना थोपटत बाहेर पडत होतं, कुणी वृद्ध आईवडिलांना धरून चालत होतं – सर्वांच्या चेहऱ्यावर एक भीती होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब

या बॉम्बचं वय अंदाजे 80 वर्षांहून अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जर्मनीवर जोरदार हल्ला केला होता, त्यावेळी अनेक बॉम्ब फेकले गेले. काही फुटले, काही खोल जमिनीत रुतून राहिले. आजही जर्मनीत वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा स्फोटकांचा शोध लागतो. मात्र त्यातला प्रत्येक क्षण जीव धोक्यात घालणारा असतो.

1945 नंतर पहिल्यांदा स्थलांतर

अधिकार्‍यांनी विशेष दक्षतेने बॉम्ब निष्क्रिय केला. हे काम केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून नव्हतं, तर अनुभव, संयम आणि नागरिकांच्या सुरक्षेची तीव्र जबाबदारी त्यामागे होती. या घटनेमुळे 1945 नंतर पहिल्यांदाच कोलोन शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरित करण्यात आलं. एका शहराला एकदम थांबवून टाकणारी ही घटना होती.