अंकशास्त्राच्या जगात काही अंक असे असतात जे जन्मतःच माणसाच्या स्वभाव, भविष्य आणि जीवनशैलीवर खोल प्रभाव टाकतात. यापैकी एक अंक आहे ‘1’. हा अंक केवळ गणितात पहिला असतो असं नाही, तर तो व्यक्तीच्या जीवनातही पहिलाच आणि सर्वात प्रभावी ठरतो. हा अंक असलेल्या लोकांचा आत्मविश्वास, ऊर्जा आणि जगण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळीच असते.

मूलांक 1 असणारे लोक म्हणजे एक स्वतंत्र विश्व. त्यांचा जन्म ज्या दिवशी होतो, म्हणजेच 1,10,19 किंवा 28 तो दिवसच त्यांना ‘लिडर’ बनवतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सूर्याचा प्रभाव असतो, आणि जसं सूर्य स्वतः प्रकाशमान असतो, तसंच हे लोकही समाजात स्वतःचं स्थान निर्माण करतात. हे लोक आपल्याभोवती एक तेज निर्माण करतात, जेव्हा ते कुठेही जातात, तिथे त्यांची ओळख आपोआप तयार होते.
मूलांक 1 चा स्वभाव
पैशाच्या बाबतीत हे लोक नशिबाचे लाडके ठरतात. व्यवसाय, कला, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये हे अग्रेसर असतात. त्यांच्याकडे विलासी जीवन जगण्याची ताकद असते आणि ते त्या जीवनशैलीचा मनमुराद आनंद घेतात. त्यांना केवळ संपत्ती नव्हे, तर प्रसिद्धीही हव्यासाने आकर्षित करते. शाहरुख खान, धीरूभाई अंबानी किंवा मुकेश अंबानी यांसारखे लोक याच वर्गात मोडतात.
हे लोक जन्मतःच लीडर असतात. त्यांना कोणाच्याही मागे चालायचं नसतं, ते स्वतःच नवा मार्ग तयार करतात. त्यांचं प्रत्येक पाऊल धाडसी असतं आणि त्यांच्या मनात नेहमी मोठं काही करण्याची धग असते. ते खूप ठाम, पण त्याचवेळी हळवेही असतात. त्यांच्या कठोर आणि तेजस्वी चेहऱ्यामागे एक भावनिक मन असतं, जे फक्त काही निवडक लोकांनाच दिसतं.
लव्ह लाईफ
प्रेमाच्या बाबतीतही ते अतिशय गंभीर असतात. नात्यांमध्ये ते पूर्ण समर्पित राहतात. एकदा मन दिलं, की ते नातं शेवटपर्यंत निभावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण जर कोणी त्यांच्यावर विश्वासघात केला, तर ते सहज माफ करत नाहीत. ते रागाने थरथरून उठतात आणि बदला घेताना समोरच्याला अश्रूंचा हिसका काय असतो, हे दाखवून देतात.
तरीही, ते खूप निष्पाप असतात. त्यांच्या आयुष्यात सूर्य महत्त्वाचा असतो. त्यामुळे दर रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण करणं, “ॐ सूर्याय नमः” या मंत्राचा जप करणं, आणि स्वतःचा राग नियंत्रणात ठेवणं हे त्यांच्या जीवनात स्थिरता आणू शकतं.