प्रोजेक्ट विष्णूने शत्रू देशात खळबळ! भारत एकाचवेळी बनवणार 12 हायपरसोनिक मिसाईल्स; तब्बल 2,000 किमी रेंजने करणार शत्रूवर मारा

Published on -

भारताची संरक्षणक्षमता आता एका नव्या टप्प्यावर पोहोचू लागली आहे आणि त्यामागे एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘प्रोजेक्ट विष्णू’. डीआरडीओ (DRDO) या भारताच्या संरक्षण संशोधन संस्थेने सुरु केलेला हा प्रकल्प केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नाही, तर तो आपल्या शेजारी देशांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. आजपर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महासत्तांकडे असलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानामध्ये आता भारतदेखील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झेपावत आहे.

काय आहे ‘प्रोजेक्ट विष्णू’?

‘प्रोजेक्ट विष्णू’ अंतर्गत भारताने एकाच वेळी तब्बल 12 प्रकारची हायपरसोनिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या क्षेपणास्त्रांपैकी काही केवळ हल्ला करण्यासाठी आहेत, तर काही शत्रूच्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.

हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र म्हणजे भारतासाठी एक महत्त्वाचं हवाई संरक्षण कवचच ठरणार आहे. या प्रकल्पात समाविष्ट असलेले ET-LDHCM नावाचे क्षेपणास्त्र Mach 8 म्हणजेच जवळपास 11,000 किमी/तास या अविश्वसनीय वेगाने उडू शकते, जे आजवर कोणत्याही देशासाठी सहज सुलभ नव्हते.

या वेगाने उडणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखणे जवळपास अशक्यच असते. त्यातही या क्षेपणास्त्रांमध्ये स्क्रॅमजेट इंजिनचा वापर करण्यात आला आहे, जे त्यांना प्रचंड वेग आणि स्थैर्य देतात. इतकेच नव्हे, तर ही क्षेपणास्त्रे लाँच झाल्यानंतर देखील त्यांचा मार्ग किंवा लक्ष्य कमांड सेंटरमधून नियंत्रित करता येतो. यामुळे ती कोणत्याही वेळेस दिशा बदलू शकतात, जे शत्रूसाठी मोठं संकट ठरू शकतं.

वैशिष्ट्ये

या संपूर्ण प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे, ही क्षेपणास्त्रं मोबाईल लाँचरपासून ते लढाऊ विमानांपर्यंत आणि युद्धनौकांपर्यंत कुठूनही डागता येतात. म्हणजेच, भारताला आता आकाशात, जमिनीवर आणि समुद्रात एकाच वेळी दहशत निर्माण करता येईल. ही लवचिकता आणि बहुपर्यायी वापरशक्ती भारताच्या लष्करी धोरणात एक नवा आत्मविश्वास निर्माण करते.

या क्षेपणास्त्रांच्या रेंजबाबत बोलायचं झालं, तर ती 2,000 किमी पर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ असा की पाकिस्तानसह भारताचे अनेक शेजारी देश याच्या थेट टप्प्यात येतात. या क्षेपणास्त्रांमध्ये पारंपरिक स्फोटकांपासून ते लघुउर्जास्त्रांपर्यंत वाहून नेण्याची क्षमता असल्यामुळे, याचा सामरिक उपयोग अत्यंत व्यापक आहे.

प्रगत नेव्हिगेशन प्रणाली, रडारला चकमा देणारे डिझाईन आणि आशियातील सामरिक संतुलन बदलण्याची क्षमता या सगळ्यांनी प्रोजेक्ट विष्णू हा केवळ एक तांत्रिक प्रकल्प न राहता, तो भारताच्या संरक्षण धोरणाचा महत्वाचा पैलू ठरतो आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!