शेअर, सोनं, की मल्टी-अ‍ॅसेट फंड? कमी जोखमीसह जास्त कमाई देणारा पर्याय कोणता?; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Published on -

गुंतवणुकीचं जग कधीच स्थिर नसतं. एकीकडे शेअर बाजार सतत चढ-उतार अनुभवतोय, तर दुसरीकडे सोनं आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंचे दरही वेगवेगळ्या घटनांमुळे वाढत-घटत असतात. अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदार गोंधळात पडतो. शेअर बाजारात पैसा घालावा की सोनं खरेदी करावं? की म्युच्युअल फंड निवडावा? प्रत्येक पर्यायामागे काही फायदे आणि काही धोके लपलेले असतात. त्यामुळे जोखीम आणि परतावा या दोघांमध्ये योग्य तो समतोल राखणं महत्त्वाचं ठरतं.

‘मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड’

याच अनिश्चिततेच्या काळात ‘मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड’ ही संकल्पना अनेक गुंतवणूकदारांसाठी आधारस्तंभ ठरते आहे. हे फंड असे असतात की जे एकाच वेळी विविध मालमत्तांमध्ये म्हणजेच इक्विटी, कर्ज, सोनं आणि इतर वस्तूंमध्ये पैसा गुंतवतात. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात नुकसान झालं, तरी दुसऱ्या क्षेत्रातून परतावा मिळतो आणि एकूण पोर्टफोलिओवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. शिवाय, या फंडांचं व्यवस्थापन व्यावसायिक तज्ञांकडून केलं जातं, जे बाजाराचं बारकाईनं निरीक्षण करत असतात आणि योग्य वेळेला गुंतवणुकीचे निर्णय घेतात.

अनेकजण आज ‘निष्क्रिय मल्टी-अ‍ॅसेट फंड’ किंवा Passive Multi-Asset Funds चा पर्यायही निवडू लागले आहेत. या फंडांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला Nifty Index Fund, Gold ETF, Silver ETF सारख्या विविध मालमत्तांमध्ये आपोआप गुंतवणूक होते. या सगळ्या मालमत्ता श्रेणींवर आधारित ETF म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेड फंड, जे शेअर बाजारात सहज खरेदी-विक्री करता येतात. Passive फंडांमध्ये व्यवस्थापन खर्चही कमी असतो आणि जोखीमसुद्धा तुलनेने कमी राहते.

सोने-चांदी गुंतवणूक

सध्या बाजारातील परिस्थितीकडे पाहिलं तर सोनं आणि चांदीच्या किमतीत बरेच चढ-उतार दिसत आहेत. एकीकडे मध्यवर्ती बँकांकडून वाढत असलेल्या खरेदीमुळे आणि दुसरीकडे जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे, सोनं-चांदीला काही प्रमाणात फायदा होत आहे. तर शेअर बाजार सुद्धा काहीसा सावरतो आहे. अशावेळी, प्रत्येक क्षेत्रात थोडी-थोडी गुंतवणूक करणं हेच सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाचं पाऊल ठरतं.

ग्रो प्लॅटफॉर्मची आकडेवारी

वास्तविक पाहिलं तर, ग्रो या गुंतवणूक प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये आतापर्यंत 11,054 कोटी रुपयांची गुंतवणूक मल्टी-अ‍ॅसेट फंडांमध्ये झाली आहे. ही संख्या हायब्रिड फंडांच्या सर्व श्रेणींपैकी दुसऱ्या क्रमांकाची आहे, जी या फंडांच्या लोकप्रियतेचं द्योतक आहे. याचबरोबर, गेल्या वर्षभरात 24 पैकी 8 मल्टी-अ‍ॅसेट फंडांनी 10% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, हे त्यांच्या कामगिरीचं स्पष्ट उदाहरण आहे.

आज जेव्हा सामान्य माणूस भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेचा विचार करतो, तेव्हा त्याने कोणत्या एका पर्यायावर अवलंबून न राहता, एक समतोल आणि संतुलित गुंतवणुकीचा मार्ग स्वीकारावा. कारण शेअर बाजारात चढ-उतार असतील, सोन्याच्या किमती वाढतील की घटतील, हे सांगणं कठीण असतं. पण जर तुमचं पोर्टफोलिओ विविध क्षेत्रांमध्ये विभागलेलं असेल, तर तुम्ही कितीही संकटात असलात तरी तुमची गुंतवणूक तुलनेनं सुरक्षित राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!