फक्त 50 रुपये खर्च करा आणि पाहा कमाल! संपूर्ण घर काश्मीरसारखं थंड होईल, कूलर देईल एसीसारखा गारवा

Published on -

सध्या पावसाळ्याचा ऋतु असला तरी अनेक ठिकाणी दमट हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. कधी पाऊस तर कधी अचानक कडक ऊन या वातावरणामुळे घरात कूलर, एसीची गरज भासतेच. पण सगळ्यांकडे एसी असतोच असं नाही, आणि असला तरी त्याचे बिलही भारी लागतं. त्यामुळे अनेक घरांमध्ये कुलर हेच एकमेव थंडावा देणारं साधन ठरतं. पण कधी-कधी कुलरची हवा देखील गरम लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा जुनाट कुलर एसीसारखा थंड करायचा असेल, तर एक अतिशय सोपा आणि स्वस्त उपाय तुमच्या उपयोगाचा ठरू शकतो.

उष्णता वाढली की झोपही लागत नाही, जेवणही जात नाही आणि दिवसभर बेचैनी वाढतच जाते. घरात बसूनसुद्धा घामाने नुसतं अंग भिजून निघतं. अशा वेळी कुलरकडून आपल्याला भरपूर थंड हवा मिळेल, अशी अपेक्षा असते. पण जर कुलरनेही आपल्याला फसवलं, तर मग काय करायचं?

कूलरमधील कॅपेसिटर करेल कमाल

याच समस्येवर काही इलेक्ट्रिशियन आणि तज्ञांनी एक अतिशय साधा उपाय सुचवला आहे. तुमच्या कुलरमधला जुना कॅपेसिटर (Capacitor) बदलून टाका. हो, फक्त कॅपेसिटर. हा एक छोटासा भाग असतो जो पंख्याचा वेग नियंत्रित करतो. वेळोवेळी त्याची क्षमता कमी होते, आणि मग कुलरचा पंखा पूर्ण ताकदीने फिरत नाही. त्यामुळे कुलर थंड हवा न देता फक्त उष्ण हवेचा झोत टाकतो.

आता लक्षात ठेवा, नवीन कॅपेसिटर मिळतो फक्त 50 ते 100 रुपयांमध्ये. हा तुम्हाला कुठल्याही इलेक्ट्रिक दुकानात सहज मिळू शकतो. तो बदलल्यानंतर, पंखा अधिक वेगाने फिरू लागतो, आणि त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाने थंड हवा अधिक प्रमाणात बाहेर येते.

कॅपेसिटर कसा बदलणार?

कॅपेसिटर बदलायचा सोपा मार्गही आहे. प्रथम कुलर बंद करा, प्लग काढून टाका. त्यानंतर पॅनल उघडून मोटरजवळ असलेला कॅपेसिटर शोधा. त्याचं वायरिंग नीट लक्षात ठेवा आणि मग हळूच ते काढा. नवीन कॅपेसिटर लावा आणि पॅनल बंद करा. कुलर चालू करून बघा, हवा खरंच बदललेली वाटेल.

विशेषतः जुन्या कुलरमध्ये हा बदल दर 2-3 वर्षांनी करणे अत्यंत गरजेचे असते. कधीकधी आपण कुलर काम करत नाही म्हणून नवा घेण्याचा विचार करतो, पण हेच छोटेसे सुधारलेले पाऊल तुमचा खर्च वाचवू शकते आणि थंडावा दुप्पट करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!